
-
ऋजुता लुकतुके
भारतीय जनता पार्टी (BJP), नॅशनल काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासह देशातील सगळ्याच राजकीय पक्षांना पक्ष चालवण्यासाठी देणग्या कुठून मिळतात, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. कारण, निवडणुकीचा अफाट खर्च आणि विविध सभांचा खर्च पाहता पक्षांची उलाढाल एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनी इतकीच असते. भारतीय निवडणूक आयोग ही माहिती वेळोवेळी संकलित करत असते. पक्षांना मिळणारा कॉर्पोरेट निधी खूप महत्त्वाचा ठरतो. कारण, त्यातून कुठल्या उद्योजकाची राजकीय पक्षांबरोबर असलेली जवळीक कळते. निवडणूक आयोगाकडे असलेली ही माहिती एडीआर या संस्थेनं अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक कॉर्पोरेट निधी मिळालेला या अहवालातून समोर आला आहे. (Political Party Funding)
त्याखालोखाल काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टीचा (AAP) क्रमांक लागतो. भाजपाला (BJP) एकूण ८,३५८ देणग्या मिळाल्या. आणि त्याची एकत्रित रक्कम ही २,२४३ कोटींची आहे. त्या तुलनेत काँग्रेस पक्षाला मिळालेला निधी आहे २९४ कोटींचा. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस, आप, एनपीईपी (National People’s Party) आणि सीपीआय (Communist Party of India) या पहिल्या पाचांत असलेल्या इतर पक्षांना मिळून मिळालेला एकत्रित निधी हा एकट्या भाजपाला (BJP) मिळालेल्या निधीच्या ६ पट कमी आहे. (Political Party Funding)
(हेही वाचा – Gold Rate Fall : सोन्याच्या किमती वाढायला हव्यात तिथे कमी का होत आहेत?)
कुठल्या कॉर्पोरेट संस्थांनी देणग्या दिल्या त्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. एडीआर अहवालात २०,००० रुपयांपेक्षा जास्त रुपयांची प्रत्येक देणगी ही विचारात घेतली आहे. पहिल्या १० क्रमांकाचे देणगीदार पाहूया,
- प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट – या ट्रस्टने भाजपा आणि काँग्रेसला मिळून ८०० कोटी रुपयांच्यावर देणगी दिली.
- ट्रायंफ इलेक्टोरल ट्रस्ट – या ट्रस्टने भाजपाला १७३ कोटींची देणगी दिली.
- डिराईव्ह इन्व्हेस्टमेंट – या कंपनीने भाजपाला ५० कोटी तर काँग्रेसला २.२ कोटी रुपये दिले.
- ॲक्मे सोलार एनर्जी लिमिटेड – या कंपनीने एकत्रितपणे ५१ कोटी रुपयांची देणगी दिली
- रुंगठा सन्स – या कंपनीने ५० कोटी रुपयांची देणगी दिली
- भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड – ५० कोटी रुपये
- आयटीसी इन्फोटेक इंडिया लिमिटेड – ८० कोटी रुपये
- दिनेश चंद्रा आर इन्फोकॉम – भाजपाला ३० कोटी रुपये दिले
- दीलिप बिल्डकॉन – २९ कोटी रुपये
- मॅक्रोटेक डेव्हलपर्स – २७ कोटी रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community