पुढील पंतप्रधान कोण असणार? मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, २०२९ मध्ये…

196

Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे. दरम्यान, बिकेसी येथील आयजीएफ मुंबई NXT-25 (IGF Mumbai NXT-25) या इंडिया ग्लोबल फोरमने आयोजित केलेल्या प्रमुख वार्षिक शिखर परिषदेत (India Global Forum Summit 2025) ते संवाद साधत होते. ही परिषद मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (Jio World Convention Center) येथे ही आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) उत्तराधिकाऱ्यांबद्दल प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘हे’ विधान केले. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – आता महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदतीला असणार Sakhi Desk)

इंडिया ग्लोबल फोरमने आयोजित केलेल्या प्रमुख वार्षिक शिखर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर  म्हणाले की, २०२९ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. असा दावा त्यांनी केला. त्यामुळे मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे विधान केले. दरम्यान, मुंबईतील एमएमआरडीए (Mumbai MMRDA Project) अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने हातात घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या फंडांसाठी मंगळवारी, ०८ एप्रिल रोजी करार झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यात 4 लाख 7 हजार कोटी रुपयांचे फंडिंग या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता या अंतर्गत होणाऱ्या प्रोजेक्टला कोणताही निधी कमी पडणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये रस्ते, मेट्रो, टनेल अशा प्रकल्पाचा समावेश आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

(हेही वाचा – Raigad च्या संवर्धनाच्या प्रक्रियेला वेग; ३५ कोटी रुपये निधी वितरित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश)

एमएमआर प्रदेशाला 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवणार
आज, रस्ते, रेल्वे, पिण्याचे पाणी, महामार्ग, किनारी रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यासारख्या एमएमआरडीए प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचा गुंतवणूक करार करण्यात आले आहे. एमएमआर प्रदेशाला 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही नीती आयोगासोबत तयार केलेल्या रोड मॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक ऐतिहासिक करार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.