
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपूरमध्ये (Bilaspur) ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धर्मांतराचा खेळ सरार्स सुरु आहे. याठिकाणी धर्मांतराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. दरम्यान, रामनवमीच्या दिवशी सरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहतराई येथील प्रार्थना सभेच्या नावाखाली होत असलेल्या धर्मांतराचा डाव हिंदू (Hindu) संघटनांनी उधळून लावला आहे. यावेळी हिंदू (Hindu) कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी धर्मांतराविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाद्री दीपक सिंह सिदारसह ६ जणांना अटक केली. (Conversion)
( हेही वाचा : सर्व शाळांमध्ये घुमणार ‘Jai Jai Maharashtra Majha’ गीत; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय)
दरम्यान धर्मांतराची (Conversion) माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिस येताच वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. सरकंडा पोलिस स्टेशनचे प्रभारी नीलेश पांडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान असे उघड झाले की दीपा गोटेल तिच्या घरात प्रार्थना सभेचे आयोजन करत होती. तिथे पाद्री दीपक सिंह सिदार आणि त्यांची पत्नी पूजा सिदार लोकांना ख्रिस्ती धर्मांबद्दल माहिती देत असतं. घटनास्थळावरून पोलिसांनी दीपा गोटेल, दीपक सिंह सिदार, पूजा सिदार, गुरविंदर सिंग, शिवकुमार धीवार आणि मधु कुमार केवट यांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले. (Conversion)
टीआय नीलेश पांडे म्हणाले, “प्रार्थना सभांच्या बहाण्याने धर्मांतर होत असल्याची तक्रार मिळाली होती. चौकशीनंतर छत्तीसगड (Chhattisgarh) धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे.” पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “निखिल आश्रम, अटल आवास, दीपा गोटेल आणि पाद्री दीपक सिंह सिदार आणि त्यांची पत्नी पूजा सिदार यांच्यासह गुरविंदर सिंह, शिवकुमार धीवार (Shivkumar Dhiwar) आणि मधु कुमार केवरा यांच्यासह सुमारे ५० लोकांना हिंदू (Hindu) धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जात होते.” (Conversion)
हिंदू संघटनेचे कार्यकर्ते राम सिंह ठाकूर (Ram Singh Thakur) म्हणाले, “दर रविवारी बहतराई येथील अटल आवास येथे ख्रिस्ती प्रार्थना सभेचे आयोजन केले जात होते. रामनवमीच्या दिवशीही हिंदूंना उपचार सभेच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. हे लोक निष्पाप लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करतात.” ते म्हणाले की, कोनी, साक्री, सिव्हिल लाईन आणि मास्तुरीनंतर आता सरकंड्यातही हा खेळ सुरू झाला आहे. “आम्ही हे सहन करणार नाही,” असे त्यांनी जोर देऊन सांगितले. (Conversion)
एका स्थानिक रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “हे लोक प्रथम लोकांना आमिष दाखवतात आणि नंतर हळूहळू दबाव निर्माण करतात. आमच्या परिसरातील अनेक लोक आधीच या बैठकांना उपस्थित राहिले आहेत.” बिलासपूरला धर्मांतराचे केंद्र बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे आणि ते थांबवण्यासाठी ते सर्वतोपरी पाऊल उचलतील, असे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपूरमध्ये ख्रिश्चन मिशनरी बऱ्याच काळापासून सक्रिय आहेत. अलिकडेच पुजाऱ्यासह अनेक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी देवी-देवतांबद्दल बकवास बोलून हिंदूंची (Hindu) दिशाभूल केली जात होती. तथापि, पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community