Ahmedabad मध्ये रामनवमीला गुंडगिरी करणाऱ्या वाजिद शहेनशाहला अटक

100
Ahmedabad मध्ये रामनवमीला गुंडगिरी करणाऱ्या वाजिद शहेनशाहला अटक
Ahmedabad मध्ये रामनवमीला गुंडगिरी करणाऱ्या वाजिद शहेनशाहला अटक

अहमदाबादमध्ये (Ahmedabad) रामनवमीनिमित्त (Rama Navami) भाजपा कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणारा, भाजपाचे (BJP) झेंडे फाडणारा आणि हिंदूंना लक्ष्य करणारा कुख्यात गुंड वाजिद शहेनशाह (Wajid Shahenshah) याला पोलिसांनी अटक केली आहे. वाजिदच्या अटकेची माहिती अहमदाबाद (Ahmedabad) पोलिसांनीच वृत्तसंस्थांना दिली आहे. एवढेच नाही तर वाजिदसह त्याच्या इतर दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : Summer Special Train 2025 : मध्य रेल्वे उन्हाळी सुट्टीत चालवणार विशेष गाड्या; ‘असे’ आहे नियोजन

रामनवमीला (Rama Navami) दि. ६ एप्रिल रोजी वाजिद शहेनशाहने अहमदाबादमधील (Ahmedabad) दानिलिमडा येथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच दिवशी भाजपाचा (BJP) स्थापना दिवस देखील होता. त्यामुळे काही कार्यकर्ते भाजपाचे (BJP) झेंडे लावत होते. त्यावेळी वाजिद शहेनशाह (Wajid Shahenshah) नावाचा एक कुख्यात दंगलखोर घटनास्थळी पोहोचला आणि त्याने भाजपाचे झेंडे केवळ उतरवलेच नाहीत तर ते फाडून फेकण्यासही सुरुवात केली. यावेळी त्याने भाजपा कार्यकर्त्यांना शिवीगाळही केली. भौमिक आणि इतर कार्यकर्त्यांनी वाजिदला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा त्याने जातीसंबंधी अपशब्द वापरण्यास सुरुवात केली आणि त्यांना तेथून हाकलून लावले. यावेळी दोन्ही बाजूंनी जमाव घटनास्थळी जमा झाला. ज्यामध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती. मात्र, यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी शहेनशाहच्या कृत्याचा निषेध केला आणि शहेनशाह (Wajid Shahenshah) तसेच त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत रस्ता रोखला. (Ahmedabad)

तक्रारदार भौमिक सोखडिया (Bhowmik Sokhadia) हे दाणीलिमडा येथील भाजपाचे प्रभाग अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, “सोमवारच्या कार्यक्रमासाठी मी कार्यकर्त्यांसोबत पक्षाचे झेंडे लावत होतो. त्यावेळी वाजिद शहेनशाह नावाचा एक कुख्यात गुंड तिथे पोहोचला. त्याने आम्हाला शिवीगाळ केली आणि झेंडे फेकून दिले. आम्ही विरोध केला तेव्हा त्याने मला ढकलले आणि जातीय भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने पंतप्रधान मोदींविरुद्धही (Narendra Modi) अपशब्द वापरले.” मात्र, आता अहमदाबाद पोलिसांनी आरोपी शहेनशाह (Wajid Shahenshah) आणि त्याच्या साथीदारांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास एससी-एसटी सेलकडे सोपवण्यात आला आहे. (Ahmedabad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.