तेलंगणाच्या (Telangana) हैदराबाद (Hyderabad) येथील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ५ दोषींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. हैदराबाद येथे दि. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दिलसुखनगरमध्ये २ प्राणघातक स्फोट झाले होते. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता तर १३१ जण जखमी झाले होते. (Hyderabad Bomb Blast)
( हेही वाचा : राज्य सरकारकडून आलेल्या रकमेतील ४० कोटी दिले MSRTC बँकेला; कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम)
हैदराबादमधील (Hyderabad) दिलसुखनगरमध्ये (Dilsukhnagar) झालेल्या बॉम्बस्फोट (Hyderabad Bomb Blast ) प्रकरणी दि. १३ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रीत तपास संस्था ( एनआयए) न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनच्या (Indian Mujahideen) या दहशतवादी संघटनेच्या सह-संस्थापक मोहम्मद अहमद सिद्दीबापा उर्फ यासिन भटकल, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उर्फ वकास, असदुल्ला अख्तर उर्फ हड्डी, तहसीन अख्तर उर्फ मोनू आणि एजाज शेख यांच्यासह ५ सदस्यांना दोषी ठरवले होते. तसेच या ५ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दोषींनी तेलंगणा उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती के. लक्ष्मण (K. Laxman) आणि पी. श्री सुधा यांच्या खंडपीठाने दहशतवाद्यांनी दाखल केलेली फौजदारी पुनर्विचार अपील फेटाळून लावले. ‘एनआयए’ न्यायालयाने सुनावलेल्या फाशीचा निर्णय कायम ठेवला आहे. (Hyderabad Bomb Blast)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community