Monsoon 2025 : ‘स्कायमेट’चा मान्सून 2025 साठी अंदाज जाहीर ; महाराष्ट्रात किती टक्के पाऊस ? वाचा सविस्तर …

Monsoon 2025 : 'स्कायमेट'चा मान्सून 2025 साठी अंदाज जाहीर ; महाराष्ट्रात किती टक्के पाऊस ? वाचा सविस्तर ...

148
Monsoon 2025 : 'स्कायमेट'चा मान्सून 2025 साठी अंदाज जाहीर ; महाराष्ट्रात किती टक्के पाऊस ? वाचा सविस्तर ...
Monsoon 2025 : 'स्कायमेट'चा मान्सून 2025 साठी अंदाज जाहीर ; महाराष्ट्रात किती टक्के पाऊस ? वाचा सविस्तर ...

भारतातील आघाडीची हवामान अंदाज संस्था ‘स्कायमेट’ने मान्सून 2025 (Monsoon 2025) साठीचा अंदाज जाहीर केला आहे. यंदाचा मान्सून सामान्य राहिल आणि जून ते सप्टें. या काळात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात ५ टक्के चढ- उतार शक्य आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार या चार महिन्यात 868.6 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. (Monsoon 2025)

हेही वाचा-विधानसभेने मंजूर केलेली विधेयके राज्यपालांनी रोखण्यावर Supreme Court ने घातले निर्बंध

स्कायमेटचे जतिन सिंह यांच्या मते, ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. (Monsoon 2025)

हेही वाचा- Donald Trump : ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा ! अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर

हिंदी महासागरातील स्थिती एलनिनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. एलनिनो दक्षिणी दोलन प्रभावी नसणं त्याचवेळी आयओडी सकारात्मक असल्यानं चांगला पाऊस येऊ शकतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. (Monsoon 2025)

हेही वाचा- CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का ! सीएनजी-पीएनजीचे दर वाढले

स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल. (Monsoon 2025)

हेही वाचा- बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ९० दिवसांच्या प्रमाणपत्राची अंमलबजावणी सोप्या पद्धतीने करा; Adv. Akash Fundkar निर्देश

जून महिन्यात सरासरीच्या 96 टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात 1023 टक्के पाऊस होईल तर 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108 टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104 टक्के पावसाची नोंद होऊ शकते. तर,167.9 मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Monsoon 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.