1 of 8

सध्या उन्हाळा सुरू झाला असून प्रत्येक जण उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहे. अशातच उन्हाळ्याच्या दिवसात सर्वचजण कलिंगड किंवा टरबूज खाणं पसंत करतात. (Watermelon)

यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि पचनसंस्था देखील मजबूत होते. (Watermelon)

कलिंगड खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. उन्हाळ्यात ते शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत करते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारते. (Watermelon)

उन्हाळ्यात तुम्ही दररोज कलिंगड खाऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आवश्यक पोषण देखील मिळते. मात्र, एकाच वेळी खूप जास्त कलिंगड खाऊ नये. (Watermelon)

कलिंगड हे एक असे फळ आहे जे सर्वांना आवडते. पण कलिंगड कसं खरेदी करायचं हे सर्वांनाच माहिती नसते. यामध्ये अनेक लोकं बऱ्याचदा फसतात. त्यामुळे योग्य कलिंगड खरेदी करण्यासाठी या काही खास ट्रिक्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. (Watermelon)

चांगलं कलिंगड हे नेहमी वजनाने भारी असते. जर कलिंगड हलकं असेल तर ते आतून पोकळ किंवा पांढर असण्याची शक्यता असते. जेव्हाही तुम्ही कलिंगड खरेदी करायला जाल तेव्हा त्याचे वजन योग्य आहे की नाही ते तपासून मगच कलिंगडची निवड करा. गोड आणि लाल कलिंगड त्याच्या आकाराच्या मानाने वजनदार असते. ते वजनदार असण्याचे कारण म्हणजेच ते रसाळ असते. (Watermelon)

चांगल्या कलिंगड किंवा टरबूजचा रंग हा एकसारखा आणि चमकदार असतो. जर कलिंगडाचा रंग एकसारखा नसेल किंवा वेगवेगळे डाग त्यावर असतील तर ते आतून खराब निघू शकते. (Watermelon)

जर तुम्ही कलिंगड खरेदी करताना बारकाईने पाहिले तर त्यावर एक पिवळा डाग तुम्हाला दिसेल. जर कलिंगडवर हा पिवळा डाग असेल तर ते व्यवस्थित पिकलं आहे आणि आतून लाल असते. कारण हा डाग कलिंगड शेतात असताना सूर्यप्रकाशामुळे त्यावर पडतो. जर तुम्ही कलिंगड खरेदी करायला गेलात आणि त्यावर पिवळा डाग असेल तर ते आतून गोड आणि लाल असल्याचं लक्षण मानले जाते. (Watermelon)