OM Certificate : हिंदू सणांमध्ये नाशिक झाले ‘ओम’मय

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली पाठोपाठ नाशिक येथेही 'हिंदू ग्राहक जागृती अभियानाची' मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होऊन यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले, नाशिक येथील स्वागत यात्रेतील हे अभियान आणि ओम प्रमाणपत्र जागृती हे विशेष आकर्षण ठरले.

62

नाशिक देवभूमी म्हणून ओळखली जाते, या नाशिकमध्ये बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक हिंदूंचे पवित्र स्थान त्र्यंबकेश्वर आहे. या नाशिकमध्ये गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये लाखो संख्येने नाशिककर सहभागी झाले होते. यामध्ये सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले ते ‘ओम प्रतिष्ठान’ पुरस्कृत ‘ओम प्रमाणपत्र’ (OM Certificate) या दोन सणांच्या निमित्ताने ‘ओम प्रमानपत्रा’चा जयघोष पहायला मिळाला.

हिंदूंना थूक, फूक आणि चरबी मुक्त अन्नपदार्थ आणि पूजासाहित्यांची सर्रास विक्री केली जाते, त्यापासून हिंदू ग्राहकांची फसवणूक रोखण्यात यावी, याकरता ओम प्रतिष्ठानची स्थापना केली. ‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत आपला व्यवहार’ या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यावसायिकांसाठी, सेवा पुरवठादारांसाठी १४ जून २०२४ पासून ओम प्रमाणपत्र नोंदणी अभियान सुरू झाले.

hindu 4

नाशिकमधील ओम प्रतिष्ठानचे स्वयंसेवक गेले कित्येक महिने अगदी झोकून देऊन काम करत होतेच, पण गुढीपाडवा आणि रामनवमी यादिवशी केलेल्या ओम प्रमाणपत्र (OM Certificate) नोंदणी आणि हिंदू ग्राहक नोंदणीच्या प्रसाराला नाशिककरांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

(हेही वाचा Hindu : ‘ओम प्रमाणपत्र’ला आता ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’ची जोड; गुढीपाडव्यापासून हिंदू ग्राहकांच्या नोंदणीला प्रारंभ)

गुढीपाडव्याच्या कालावधीत सलग तीन दिवस नाशिक महानगरपालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांनी गोदाघाट महावादन, महारांगोळी आणि शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमांमध्ये ओम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सहभागी घेऊन हस्तफलक, बॅनर, पत्रके या माध्यमांतून ओम प्रमाणपत्राची (OM Certificate) आवश्यकता आणि ग्राहकांनी सुद्धा ओम प्रमाणित होण्याचे महत्त्व याबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली पाठोपाठ नाशिक येथेही ‘हिंदू ग्राहक जागृती अभियानाची’ मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होऊन यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले, नाशिक येथील स्वागत यात्रेतील हे अभियान आणि ओम प्रमाणपत्र (OM Certificate) जागृती हे विशेष आकर्षण ठरले.

hindu 5

रामनवमी या सणाला अलोट जनसागर नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शनाला येत असतो, यावर्षीही सहस्रावधी भाविक दर्शनासाठी आले होते आणि या ठिकाणीही ओम प्रतिष्ठान स्वयंसेवकांनी ओम प्रमाणपत्र आणि ग्राहक जागृती अभियाना संदर्भात भाविकांचे प्रबोधन करून पत्रके, बॅनर, स्टँडी या माध्यमातून प्रसार, प्रचार केला, ज्यात शेकडो भाविकांनी हिंदूंपासून हिंदूपर्यंत या संकल्पनेचा धागा होत आपली नोंदणी केली.

(हेही वाचा आता ‘पितांबरी’ची उत्पादने होणार ओम प्रमाणित; Pitambari चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मोठी घोषणा)

अविरत झटणारे ओम प्रतिष्ठानचे स्वयंसेवक

  • विजय घाटबोरीकर
  • सुजाता काळे
  • गौरी गायकवाड
  • नेहा वालझाडे
  • राजश्री कुमठेकर
  • गोकुळ जगताप
  • नितीन जोशी (स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.