मुंबईत (Mumbai) 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी (Terrorism) हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला (Tahawwur Rana) कडक सुरक्षेत अखेर भारतात आणण्यात आले आहे.त्याच्यासोबत एनआयए (NIA) आणि गुप्तचर संस्था रॉ यांचे संयुक्त पथक एका खास विमानाने आज, गुरुवारी दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले.या नंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुख्यालयात नेले जात आहे. तहव्वुर राणा (Tahawwur Rana) अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Tayyiba) आणि डेव्हिड हेडलीशी (David Headley) संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. आता अखेर या प्रयत्नांना यश आले अन् राणा भारतात दाखल झाला.
( हेही वाचा : Tahawwur Rana ची अटक; १५ वर्षांनंतर आणखी उलगडणार मुंबई हल्ल्याचा कट)
अमेरिकेतून (America) आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने (NIA) अटक केली. यानंतर त्याला एनआयए मुख्यालयात नेण्यात आले तिथे त्याची चौकशी करण्यात आली. एनआयए मुख्यालयात त्याच्या चौकशीसाठी चौकशी कक्ष तयार करण्यात आला आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांच्यासह फक्त १२ सदस्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यानंतर तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तहव्वुर राणा हा पाकिस्तानी लष्कर/आयएसआयचा सदस्य आहे. तो 26/11 हल्ल्याच्या कटात सामील होता. दरम्यान, आता राणाच्या प्रत्यार्पणाबाबत पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर केले आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan) परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, “तहव्वुर राणाने (Tahawwur Rana) गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी (Pakistan) कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे त्याचे कॅनेडियन नागरिकत्व (Canadian citizen) अगदी स्पष्ट आहे. तहव्वुर राणा (Tahawwur Rana) हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक (Canadian citizen) असून, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमनचा निकटवर्तीय होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने मुंबईतील रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 लोक मारले गेले होते. त्याच प्रकरणात नोव्हेंबर 2012 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community