अमेरिकेतील (America) न्यूयॉर्कमध्ये (New York) हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. (helicopter crash) या घटनेत सीमेन्स (Siemens) कंपनीच्या सीईओंसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, सदर हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्स कंपनीचे होते.
(हेही वाचा – मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड Tahawwur Rana ला फाशी होणार ? प्रत्यार्पणासंबंधी अटींमध्ये नेमकं काय ?)
अमेरिकेतील एका हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीच्या उत्तरेकडे निघाले होते. हेलिकॉप्टर जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ (George Washington Bridge) पोहोचले तेव्हा ते दक्षिणेकडे वळले आणि काही मिनिटांनी अपघात होऊन नदीत कोसळले. सदर घटनेनंतर आपत्कालीन सेवा आणि पोलिसांच्या बोटी तातडीने परिसरात पोहोचल्या आणि पाण्यात शोध मोहीम सुरू केली.
अपघातानंतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (America)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community