-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) विनेश फोगाटचं (Vinesh Phogat) वजन स्पर्धेच्या दिवशी जास्त बसल्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र जाहीर करण्यात आलं होतं. अंतिम सामन्याच्या सकाळी तिचं वजन १५० ग्रॅमनी जास्त भरलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केलेलं अपीलही फेटाळण्यात आलं. ती भारतात परतल्यावर हरयाणातील खाप पंचायत आणि शेतकरी आदोलनातील नेते विनेशच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले होते. विनेश हरयाणात काँग्रेसच्या तिकिटावर जुलना (Jaulana) इथून निवडूनही आली. त्यानंतर हरयाणा सरकारने (Haryana Govt) तिचा पदकविजेत्या खेळाडूसारखा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे तिला हरयाणा सरकारकडून (Haryana Govt) पदक विजेत्यासाठी असलेले ४ कोटी रुपये, सरकारी नोकरी आणि हरयाणा पोलिसांतील नोकरी असे तीन पर्याय देण्यात आले होते. यातील ४ कोटी रुपयांचा पर्याय विनेशने (Vinesh Phogat) निवडला आहे.
(हेही वाचा – Deenanath Mangeshkar Charity Hospital : मंगेशकर कुटुंबावर वडेट्टीवारांचा आघात; अजित पवारांचा पलटवार)
आपलं मत विनेशनं (Vinesh Phogat) पत्राद्वारे हरयाणा सरकारला (Haryana Govt) कळवल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) यांनी यापूर्वीच विनेशला ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला हरयाणाकडून दिल्या जाणाऱ्या बक्षिसाइतक्याच सुविधा आणि आर्थिक मोबदला विनेशला (Vinesh Phogat) दिला जाईल असं असं जाहीर केलं होतं. त्यानंतर हरयाणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विनेशनं या वचनाची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली.
‘हा पैशाचा प्रश्न नाही. तर आदर आणि सन्मानाचा प्रश्न आहे,’ असं तेव्हा तिने पत्रकारांनाही बोलून दाखवलं होतं. त्यानंतर हरयाणा सरकारकडून (Haryana Govt) पटापट पावलं उचलली गेली. आणि तिला आता ४ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. (Vinesh Phogat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community