top 10 shopping malls in mumbai : शॉपिंग करायचीय? आणि कुटुंबासोबत टाईम घालवायचाय? तर हे आहेत मुंबईतील top 10 shopping malls

49
top 10 shopping malls in mumbai : शॉपिंग करायचीय? आणि कुटुंबासोबत टाईम घालवायचाय? तर हे आहेत मुंबईतील top 10 shopping malls

मुंबई शहरात अनेक अद्भुत मॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील. लोकांना मॉल्स आवडतात कारण, मॉल्समध्ये एकाच ठिकाणी अनेक गोष्टी उपलब्ध असतात. याशिवाय तुम्ही तिथे आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवू शकता.

मॉल्समध्ये तुम्ही खरेदी, खाणं आणि मजा अशा सगळ्या गोष्टी एकाच वेळी करू शकता. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिकच नाही तर, मनोरंजन राजधानी असल्यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा ओघ वाढताना दिसत आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्ध मॉल्सविषयी थोडी माहिती सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात…. (top 10 shopping malls in mumbai)

(हेही वाचा – Unseasonal Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी पावसाने घेतला ७३ लोकांचा मृत्यू)

फिनिक्स मार्केट सिटी मॉल

मुंबईतल्या सर्वांत मोठ्या शॉपिंग मॉल्सपैकी एक असलेला फिनिक्स मार्केट सिटी हा मॉल तसा तुलनेने नवीन आहे. कुर्ला इथल्या स्थानिकांना खरेदीसाठी एक नवीन आणि सुंदर ठिकाण प्रदान करण्यासाठी २०११ साली या मॉलचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

या मॉलमध्ये लोक आपला संपूर्ण दिवस विंडो शॉपिंग करण्यात घालवू शकतात. नवनवीन उत्पादने शोधू शकतात किंवा इथल्या १०० फूड आउटलेट्सपैकी कोणत्याही ठिकाणी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. हे रिटेल सेंटर निःसंशयपणे संपूर्ण शहरातील सर्वोत्तम मॉल्सपैकी एक आहे. या मॉलमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड दोन्ही मिळून ६०० स्टोअर्स, १४-स्क्रीन पीव्हीआर कॉम्प्लेक्स आणि एक मोठं मनोरंजन क्षेत्र आहे. (top 10 shopping malls in mumbai)

(हेही वाचा – Pandavkada Falls : खारघरमधील पांडवकडा धबधब्याचा इतिहास घेऊया जाणून!)

आर-सिटी मॉल

आर-सिटी मॉल हे मुंबईत असलेलं १.२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे एक भव्य शॉपिंग सेंटर आहे. या मॉलमध्ये ६० फूड आउटलेट्स आणि सुमारे १० महत्त्वाचे मल्टी-ब्रँड प्रोफेशनल शॉप्स आहेत. तसंच इथे डेट-नाईटचा परिपूर्ण अनुभव देणारे ओपन कॉर्डन सीटिंग बहुतेक स्थानिक भोजनालयांचे यूएसपी आहे. हा मुंबईतल्या सर्वांत मोठ्या मॉल्सपैकी एक आहे. हा मॉल म्हणजे दुकानदारांसाठीही स्वर्ग आहे. इथे तुम्हाला लाइफस्टाइल, एच अँड एम, शॉपर्स स्टॉप आणि यांसारखे बरेच सर्वोत्तम ब्रँड मिळू शकतात. याव्यतिरिक्त या मॉलमध्ये अनेक अपस्केल, स्वतंत्र रिटेल स्टोअर आहेत.

पॅलेडियम मॉल

जर तुम्हाला काही लक्झरी शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर पॅलेडियम मॉलला नक्की भेट द्या. पॅलेडियम हे एक आदर्श हाय फॅशन डेस्टिनेशन आहे. ते लोअर परेल इथल्या हाय स्ट्रीट फिनिक्सच्या इमारतीमध्ये आहे. डायर, टॉमी हिलफिगर, कोच, बर्बेरी, लेबल रितू कुमार, जिमी चू, लॉ’ओकिटाने आणि इतर अनेक ब्रँड्स इथे उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त इथे पा पा या, एशिया किचन बाय मेनलँड चायना, पॅलेडियम सोशल, बेरूट आणि पंजाब ग्रिल सारख्या रेस्टॉरंट्समध्ये स्वादिष्ट जेवण मिळतं. (top 10 shopping malls in mumbai)

(हेही वाचा – उबाठा पक्षाचे आमदार Sunil Raut यांच्याविरोधात गुन्हा दाखल)

इन्फिनिटी मॉल

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या सर्वांत मोठ्या रिटेल मॉलपैकी एक म्हणजे मालाड इथला इन्फिनिटी मॉल होय. या मॉलमध्ये काही सर्वोत्तम मनोरंजन स्थळं २०० पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्स आणि ३५ पेक्षा जास्त फूड आऊटलेट्सचे पर्याय आहेत. याव्यतिरिक्त इथल्या फूड कोर्टच्या सबवे, मॅकडोनाल्ड्स, सबारो, कैलाश पर्वत, होप्पीपोला, झफ्रान आणि इतर रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही अद्भुत जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. मालाड इथल्या इन्फिनिटी मॉलमध्ये एक रोमांचक इनडोअर रोलरकोस्टर आणि एक आनंददायी गेमिंग आर्केड असं दोन्ही आहे. तसंच तुम्ही बाउन्स नावाच्या स्थानिक ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये देखील मजा करू शकता.

इनऑर्बिट मॉल

मुंबई इथला चौथ्या क्रमांकाचा सर्वात जुना मॉल आणि पश्चिम उपनगरात असलेल्या इनऑर्बिट मॉलची स्थापना २००४ साली मालाड येथे झाली. या मॉलमध्ये २५ पेक्षा जास्त लोकप्रिय रेस्टॉरंटचे पर्याय आहेत. ज्यांमध्ये चिली, केएफसी, पिझ्झा हट, टी व्हिला कॅफे, द बीअर कॅफे, द आयरिश हाऊस आणि बरेच काही समाविष्ट आहे. टाइमझोनच्या मनोरंजन क्षेत्रामध्ये इथे येणारे पर्यटक वेगवेगळ्या मजेदार क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतात. ज्यांमध्ये व्हिडिओ गेम, बॉलिंग आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इनऑर्बिट मॉलविथ असलेला आयनॉक्स सिनेमा एक उत्कृष्ट चित्रपटाचा अनुभव प्रदान करतो. तसंच या मॉलमध्ये अनेक आनंददायक प्रमोशनल कार्यक्रम आयोजित केले जातात. (top 10 shopping malls in mumbai)

(हेही वाचा – Oppo Find X8 Ultra : ५० मेगा पिक्सेलचे ३ कॅमेरे असलेला ओपोचा फोन जगभरात लाँच)

ओबेरॉय मॉल

गोरेगाव इथे असलेला मुंबईच्या उपनगरातला आणखी एक शॉपिंग मॉल म्हणजे ओबेरॉय मॉल होय. इथे खरेदी पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी फर्जी कॅफे, गोरेगाव सोशल, महाराजा भोग, सॅसी टीस्पून आणि थियोब्रोमासारख्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटपैकी एकाची निवड करू शकता. तसंच या मॉलमध्ये तुम्ही पीव्हीआर थिएटरमध्ये चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त इथे असलेल्या मनोरंजन विभागात काही गेमिंग क्रियाकलापांमध्ये सहभागीही होऊ शकता. मनोरंजन आणि आनंदाने परिपूर्ण असलेला दिवस घालवण्यासाठी ओबेरॉय मॉलला भेट देण्याची शिफारस केली जाते. याव्यतिरिक्त मॉलमध्ये विविध मजेदार प्रमोशनल कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. तसंच इथे आयनॉक्समध्ये उत्कृष्ट चित्रपट पाहण्याचा अनुभवही मिळतो. इथे असलेलं टाइमझोन मनोरंजन क्षेत्र हे व्हिडिओ गेम आणि बॉलिंग सारख्या मजेदार क्रियाकलापांसह एक लोकप्रिय ठिकाण आहे.

सीआर२

जर तुम्ही दक्षिण मुंबईत असाल आणि खरेदी सोबतच मनोरंजनाच्या शोधात असाल, तर नरिमन पॉइंट इथल्या CR2 मॉलला भेट देण्याचा नक्की विचार करा. या मॉलमध्ये लॅवी, बीबा, झॉडीयाक, आफ्टरशॉक, केमिस्ट्री, कॅटवॉक, ओमेगा आणि इतर बरेच असे वेगवेगळे स्टोअर्स आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी खरेदी करायला मिळते. याव्यतिरिक्त या मॉलच्या परिसरात भरपूर उत्कृष्ट असे जेवणाचे वेगवेगळे पर्याय आहेत. ज्यात इंडिगो बर्गर प्रोजेक्ट, दक्षिण रसोई, झूडल्स, जेमीज पिझ्झेरिया, स्वीट बंगाल, के भगत ताराचंद, पाओ अँड बाओ आणि इतर अनेक पर्याय समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या मनोरंजनासाठी इनॉक्स थिएटरमध्ये चित्रपट पाहू शकता. या सर्व पर्यायांसोबत CR2 मॉल हे दक्षिण मुंबईत मजा करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. (top 10 shopping malls in mumbai)

(हेही वाचा – Lovelina Borgohain : लवलिना बोरगोहेनला बदलायचाय आपला वजनी गट)

विवियाना मॉल

जर तुम्ही ठाण्यामध्ये एक उत्तम रिटेल डेस्टिनेशन शोधत असाल, तर विवियाना मॉल हे निश्चितच भेट देण्यासारखं ठिकाण आहे. या मॉलमध्ये २५० पेक्षा जास्त स्टोअर्स आणि मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय आहेत. इथे तुमचा वेळ नक्कीच खूप छान जाईल. तुम्ही तुमचे आवडते चित्रपट इथल्या उच्च दर्जाच्या चित्रपटगृहांमध्ये पाहू शकता किंवा फन सिटीमध्ये गेम खेळण्याचा आनंदही घेऊ शकता.

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल

नवी मुंबई इथला सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल म्हणजे खरेदी आणि विश्रांतीसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. या मॉलमध्ये शॉपिंग, गेमिंग, फूड आणि मनोरंजन पर्यायांसोबतच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तुमची खरेदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एअरोपोस्टेल, मार्क्स अँड स्पेन्सर, वेस्टसाइड, ग्लोबल देसी, कव्हर स्टोरी, एच अँड एम, अ‍ॅडिडास, फॉरेस्ट इसेन्शियल्स आणि द बॉडी शॉप सारख्या वेगवेगळ्या लोकप्रिय स्टोअर्समध्ये खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, नॉर्दर्न तडका, नवी मुंबई पब एक्सचेंज, द जे, स्बारो, मॅकडोनाल्ड्स, सबवे आणि इतर अनेक उत्कृष्ट रेस्टॉरंट्समध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. (top 10 shopping malls in mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.