
Devendra Fadnavis : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (World Convention Center) या ठिकाणी ‘वेव्ह्स समिट 2025’ (Waves Summit 2025) पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnav) यांनी वेव्ह्स समिट 2025 हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव विविध सभागृहाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत माहिती दिली. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा – karjat railway station : कर्जत स्टेशनला जायचंय? पण रस्ता माहित नाही? मग हा लेख वाचा)
तसेच शिवरायांचा इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या १० दिवसांच्या रेल्वे टूरची घोषणा शुक्रवार ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे (Historical place of Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. तर यावर्षीदेखील जवळपास २३७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळाले आहे. अशी माहिती या परिषदमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विदर्भाला मोठा फायदा होणार
गोंदिया–बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे निश्चितपणे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. छत्तीसगड आणि तेलंगणासाठी व्यापार, व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिक लाईन मंजूर झाल्याने मी मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – उबाठा पक्षाचे आमदार Sunil Raut यांच्याविरोधात गुन्हा दाखल)
महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
“मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु करणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही पहा –