Cyber Fraud : देशभरात ऑनलाइनची (Online fraud) व्याप्ती वाढत चालल्यापासून सायबर गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. परिणामी यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचेही चित्र दिसत आहे. दरम्यान ऑनलाईन फसवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या झारखंडच्या जामतारा सायबर ठगांना (Jharkhand Jamtara cyber fraud) बँक खाती पुरविणाऱ्या सहाजणांच्या एका टोळीला एमआरए मार्ग पोलिसांनी (MRA Road Police Station) अटक केली आहे. (Cyber Fraud)
उमेशकुमार सुदर्शन पासवान, राहुलकुमार संजयकुमार वर्मा, अमनकुमार दिलीप प्रसाद, अनिस ऊर्फ राजकुमार विजेंद्रसिंग बहादूरसिंग, मुकेशकुमार ऊर्फ चंदू उमेश चंद्रवशी आणि अब्दुल्ला सोहरबमियाँ अन्सारी हे सर्व आरोपी बिहार आणि झारखंडचे रहिवासी आहेत.
(हेही वाचा – राज्यात लवकरच नवीन सर्किट ट्रेन सुरू होणार, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा; काय असणार खास? वाचा… )
हे आरोपी बिहारच्या जाहानाबाद, पटना आणि देवघरचे रहिवासी आहेत. यातील उमेशकुमार ट्रकचालक, अमनकुमार रिक्षाचालक, राहुलकुमार कापड व्यापारी, अनिस हा कॉलेज विद्यार्थी आहे तर मुकेशकुमार हा काहीच कामधंदा करत नाही. या टोळीने मोठ्या प्रमाणात बोगस आधारकार्ड पॅनकार्ड बनवून त्यांचा वापर बँकेत परस्पर खाती उघडण्यासाठी केला. ज्यांच्या नावे खाती उघडली त्यांना याचा थांगपत्ता देखील नव्हता.
ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बँकांची खाती पुरविणारी एक टोळीच मुंबई शहरात सक्रिय असून या टोळीने बोगस कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून या खात्यांची माहिती सायबर ठगांना दिल्याचे पोलिसांना समजले होते. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, पोलीस निरीक्षक फरीद खान, वासंती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धनेश सातार्डेकर, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस अंमलदार धादवड, तावडे, हाके, घाग, पवार, राठोड यांच्या पथकाने आरोपींची माहिती काढली आणि त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या शोधमोहिमेत फोर्ट येथील शहीद भगतसिंग रोडवरुन तीन संशयितांना आधी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे काही बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळताच बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविणारी हीच टोळी असल्याचे स्पष्ट झाले.
(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची मोठी घोषणा)
बोगस आधारकार्ड पॅनकार्ड जप्त
या टोळीतील मुख्य आरोपी बिहार आणि झारखंडमध्ये राहत असल्याचे समजताच बिहार आणि झारखंडमधून एका मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली. तसेच या आरोपींकडून पोलिसांनी ८३ बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड, बँक ऑफ महाराष्ट्रचे पाच बोगस पासबुक, बँकेची सात डेबीट कार्ड्स, गुन्ह्यांत वापरलेले नऊ मोबाईल आणि सिमकार्डचा मोठा साठा जप्त केला. या टोळीने गुगलवरुन प्रिंट पोर्टल हे पेड अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार केल्याची कबुली होती. याच कागदपत्रांवरुन त्यांनी अनेक शासकीय आणि खासगी बँकांमध्ये बचत खाती उघडली.
(हेही वाचा –कामाठीपुराच्या पुनर्विकासाला ‘नामदेव ढसाळ नगर’ नाव देण्याचा प्रस्ताव; Adv. Ashish Shelar यांची कल्पना)
या बोगस खात्यांची माहिती ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या झारखंडच्याच (Jharkhand) देवघर येथील प्रसिद्ध जामतारा सायबर ठगांना दिली. ही टोळी मोबाईल अॅपचा वापर करुन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पंतप्रधान किसान योजना आदी योजनांचा फायदा घेऊन तुमचे पैसे अडकले आहे, ते मिळवून देतो असे सांगून लोकांची फसवणूक करत होते. फसवणुकीची ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जात होती आणि आरोपींना संबंधित सायबर ठगांकडून ठराविक कमिशन दिले जात होते. याच बँक खात्यांत आतापर्यंत ऑनलाईन फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community