Nagpur जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमध्ये ॲल्युमिनियम कारखान्याचा स्फोट, ५ ठार

185

Nagpur जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी (Umred MIDC blast) परिसरातील अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 7-8 जण गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. यात दोघांचा नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. तर अद्याप एकाचा शोध लागलेला नाही. सध्या आग धुमसत असल्याने तपासात अडचणी येत आहेत. (Nagpur)



ही घटना घडली तेव्हा एकंदर दीडशे कामगार कामावर असल्याने अद्यापही थांगपत्ता न लागल्याने एकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. काही कामगार जीवाच्या आकांताने बाहेर पडल्याने सुदैवाने बचावले. ११ कामगार गंभीर जखमी झाले, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती त्यांचा मृत्यू झाला. या कंपनीचे नाव एमएमपी (MMP) असे असून रात्री सातच्या सुमारास स्फोटानंतर (MMP company blast) ही आग लागली. पावडर जळून खाक झाल्यानंतरच ही आग विझेल, अशी माहिती उमरेड पोलीस ठाण्याचे (Umred Police Station) पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजले नाही.

(हेही वाचा – French संरक्षणमंत्री भारतात येणार; भारतीय हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी करार होणार)

नागपूर, उमरेड येथून अग्निशमन यंत्रणा (Fire Brigade) कामाला लागली असली तरी पहाटेपर्यंत ही आग सर्वत्र केमिकल असल्याने धुमसत होती. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. या घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जखमींना नागपुरातील मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.