केंद्र सरकारने वक्फ सुधारित विधेयक (Waqf Amendment Bill) संसदेत संमत केले, आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले असून त्यावर अंमलबजावणीही सुरु झाली आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांनी या कायद्याला (Waqf Amendment Bill) विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तेथील ममता सरकारच मुसलमानांना याकरता उचकवत आहे. आता गुजरामधील मुसलमानही या कायद्याला (Waqf Amendment Bill) विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. जुमाचा नमाज पठण केल्यानंतर मोठ्या संख्येने मशिदीत एकवटलेल्या मुसलमानांनी लागलीच या कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
माज अदा करण्याच्या नावाखाली मुसलमान रस्त्यावर एकवटले
शुक्रवार, ११ एप्रिल या दिवशी अहमदाबादच्या कलंदरी मशिदीत जुमाच्या नमाजासाठी मुसलमान मोठ्या संख्येने जमले होते. नमाजानंतर मुसलमान वक्फ सुधारित कायद्याच्या (Waqf Amendment Bill) विरोधात रस्त्यावर उतरून निषेध करू लागले. त्यामुळे राखियाल भागात तणाव निर्माण झाला, जमावाने एक प्रमुख रस्ता रोखला, रस्त्याच्या मध्यभागी नमाज अदा करण्यासही सुरुवात केली, नमाज अदा करण्याच्या नावाखाली मुसलमान रस्त्यावर एकवटले आणि त्यांनी तिथेच नमाज पठण करण्यास सुरुवात करून रस्ता बंद आंदोलन सुरु केले. मात्र त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच, त्यांनी निदर्शकांना ताब्यात घेतले आणि परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखली.
(हेही वाचा Waqf Amendment Bill विरोधात मशिदीसमोर मुस्लिम कट्टरपंथींचे आंदोलन; गुजरात पोलिसांनी उधळला डाव)
जमावाने शुक्रवारच्या नमाजानंतर लगेच निदर्शने करण्याची योजना आखली होती. तथापि, पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सध्या, संबंधित सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि परिसरात शांतता पूर्ववत झाली आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुसलमान भडकाऊ भाषण करत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ सुधारित कायद्याच्या (Waqf Amendment Bill) माध्यमातून मशिदी आणि कब्रस्तान ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा आरोप करताना दिसत आहे. यामध्ये ती व्यक्ती ओरडताना दिसत आहे, तसेच “मोदी आणि अमित शाह कोण आहेत? हा देश त्यांच्या बापाचा आहे का? ही जमीन कोणाच्या बापाची नाही!, असेही ती व्यक्ती म्हणत होती.
Join Our WhatsApp CommunityMuslims in Ahmedabad were planning a protest against #WaqfBill after Jumma Namaz…
Gujarat Police detained them even before they start 💀💀
pic.twitter.com/bwVhA48iTk— Mr Sinha (@MrSinha_) April 11, 2025