HDFC Bank Share Price : तिमाही निकाल आणि वाढलेली परकीय गुंतवणूक यामुळे लक्ष वेधून घेतोय ‘हा’ बँकेचा शेअर

HDFC Bank Share Price : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये शुक्रवारी २ टक्क्यांची तेजी होती.

32
HDFC Bank Share Price : तिमाही निकाल आणि वाढलेली परकीय गुंतवणूक यामुळे लक्ष वेधून घेतोय 'हा' बँकेचा शेअर
  • ऋजुता लुकतुके

भारतावरील आयात शुल्क वाढीची टांगती तलवार सध्या ९० दिवसांसाठी टळली आहे. ट्रम्प प्रशासनाने २ एप्रिलला जाहीर केलेला आपला निर्णय सध्या स्थगित केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बँका, फार्मा आणि पोलाद, धातू उद्योगातील शेअर चांगलेच वर होते. त्यातीलच एक शेअर एचडीएफसीवर या आठवड्यात सगळ्यांची नजर असेल. शुक्रवारी बाजार सुरू होण्यापूर्वीच या शेअरमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदार संस्थांनी काही मोठे सौदे केल्याचं उघड झालं. म्हणजे या कंपन्यांनी या शेअरमधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. सध्या कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी ३५.५८ टक्के हिस्सेदारी ही देशांतर्गत गुंतवणूकदारांची आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांचेही १५.८४ टक्के पैसे यात गुंतवलेले आहेत. देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढलेली हिस्सेदारी पाहता शुक्रवारी या शेअरवर त्याचा परिणाम जाणवला. (HDFC Bank Share Price)

दिवसभर या शेअरमध्ये खरेदीचा जोर राहिला आणि दिवसअखेर शेअर २.२८ टक्के किंवा ४० अंशांनी वाढून १८०५ वर बंद झाला. मागच्या महिनाभरात हा शेअर ७ टक्क्यांनी वाढला आहे. व्यापारी युद्धाच्या भीतीने अलीकडे शेअर बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेला तूर्तास ब्रेक लागला आहे. आणि या ९० दिवसांत भारत आणि अमेरिका दरम्यान नवीन व्यापार करार अस्तित्वात येऊ शकतो. त्यामुळे सध्या बाजारात सकारात्मक वातावरण आहे आणि अशावेळी बँक क्षेत्रात तेजी जाणवू शकते. (HDFC Bank Share Price)

(हेही वाचा – Jio Financial Services Share Price : मुकेश अंबानींची जिओ कंपनी सुरू करणार डिजिटल कर्ज सेवा; शेअरमध्ये ४ टक्क्यांची उसळी)

New Project 2025 04 12T180247.117

त्याचबरोबर एचडीएफसी बँक ही देशातील एक आघाडीची खाजगी बँक आहे आणि बँकिंग सेवेपासून विमा, म्युच्युअल फंड, डीमॅट अशी प्रत्येक वित्तीय सेवा ही कंपनी ग्राहकांना देते. त्यामुळे कंपनीची ग्राहक संख्या मोठी आहे. त्यात ही कंपनी नियमितपणे गुंतवणूकदारांना लाभांश देण्यासाठी प्रसिद्ध आहे. एचडीएफसी, एचडीएफसी लाईफ, एचडीएफसी एग्रो अशा कंपनीच्या नोंदणीकृत उपकंपन्या आहेत. पुढील आठवड्यात एचडीएफसी बँक आपला तिमाही निकाल जाहीर करणार आहे. त्यात लाभांशाची शक्यता असल्यामुळे हा शेअर सध्या गुंतवणुकदारांचं लक्ष वेधून घेत आहे. (HDFC Bank Share Price)

एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीनेही सिपचा उच्चांक गाठल्यामुळे या कंपनीचे शेअरही सध्या चर्चेत आहेत. वित्तीय क्षेत्राचा विषय निघतो तेव्हा या शेअरला सध्या संशोधन संस्थांनीही पसंती दिली आहे. मोतीलाल ओस्वास या संशोधन संस्थेनं एचडीएफसी बँक शेअरमध्ये १२ ते १५ टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज वर्तवला आहे. (HDFC Bank Share Price)

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी आणि विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.