-
ऋजुता लुकतुके
बाँबे डायिंग ही एकेकाळची भारतातील कापड व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी. वाडिया समुहाची ही कंपनी आणि रिलायन्स समुहाचा विमल हा ब्रँड यांच्यात १९८० च्या दशकात जोरदार स्पर्धा होती. बाँबे डायिंगचे तयार कपडे आणि कापड हे निर्यात योग्य आणि निर्यात होणारं आहे. वाडिया समुहातील या उपकंपनीच्या संचालक मंडळात २०१३ सालापर्यंत टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटाही होते.
रिलायन्स बरोबरच्या स्पर्धेनंतर पुन्हा एकदा ही कंपनी बातम्यांमध्ये आली ती तिच्यावर झालेल्या कर्जामुळे. वस्रोद्योग क्षेत्रात बाहेरच्या कंपन्या आल्यावर निर्माण झालेल्या स्पर्धेत टिकणं हे आव्हान आहे. अजूनही कंपनी या आव्हानातूनच जात आहे. २०२३ साली कंपनीने वरळी आणि मुंबईतील आणखी काही जागा विरून ५,३०० कोटी रुपये उभे केले होते. ते कर्जातून थोडीफार मुक्तता मिळवण्यासाठी.
तरीही कंपनीसमोरची आर्थिक आव्हानं अजून पुरती मिटलेली दिसत नाहीत. कंपनीचा शेअर आपल्या वार्षिक उच्चांकापासून जवळ जवळ ५५ टक्के खाली घसरला आहे. महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षभरात यात ४६ टक्क्यांची घसरण झाली आहे. (Bombay Dyeing Share Price)
(हेही वाचा – HDFC Bank Share Price : तिमाही निकाल आणि वाढलेली परकीय गुंतवणूक यामुळे लक्ष वेधून घेतोय ‘हा’ बँकेचा शेअर)
शुक्रवारी बाजार बंद होताना या शेअरमध्ये २.५४ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी आठवड्याभरात शेअरने उलट ७ टक्के म्हणजे १० अंश गमावलेच आहेत. त्याला कारण आहे कंपनीचे मागचे काही तिमाही निकाल. कंपनीचा खप तुलनेनं चांगला असला आणि खप तसंच किंमत यांचं गुणोत्तर म्हणजेच प्राईस टू सेल्स रेशो चांगला असला तरी गेल्या तीन महिन्यात कंपनीचा महसूल कमी होत चालला आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये कंपनीने आपले आकडे जाहीर केले तेव्हा आधीच्या वर्षाच्या तुलनेत महसूलात तब्बल १८ टक्के घट झाली होती. मागच्या तीन वर्षांत मिळून महसूलात तब्बल १४ टक्के घट झाली आहे. महसूल घटल्यामुळे अर्थात नफाही कमी झाला आहे. कंपनीवरील कर्ज वाढत चाललं आहे. एकीकडे देशातील वस्त्रोद्योग येत्या काही वर्षांत ८४ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. पण, कंपनीचा आताचा ताळेबंद पाहता या कामगिरीत या कंपनीचा वाटा कितपत असेल ही जाणकारांसमोरची चिंता आहे.
त्यामुळेच हा शेअरही ६ महिन्यांत ४६ टक्क्यांनी खाली आला आहे. कंपनीचं पी टू ई गुणोत्तरही या क्षेत्रातील इतर कंपन्यांपेक्षा कमी आहे. तसंच गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफाही ३३ टक्क्यांनी कमी झाला आहे. लाभांश देण्यातही अनियमितता आली आहे. (Bombay Dyeing Share Price)
(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी आणि विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community