भायखळ्यात शिवसेनेला धक्का, यामिनी जाधवांची आमदारकी जाणार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता, ही बाब उघड झाल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे.

146

राज्यात महाविकास सरकार सत्तेत असून, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. मात्र आता त्यांच्याच पक्षाला एकावर एक धक्के बसता आहे. आधी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला असतानाच आता शिवसेनेचा आणखी एका आमदाराची अडचण वाढली असून, त्याची आमदारकी धोक्यात आली आहे. शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव अडचणीत आल्या असून, आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आह.

(हेही वाचा : पूरबाधित व्यावसायिकांना मिळणार स्वस्त दरात कर्ज)

काय म्हटले आयकर विभाग!

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता, ही बाब उघड झाल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आयकर विभागाने यामिनी जाधव यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 2019 च्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी आपल्याकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. यामध्ये 2.74 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलं होतं. तर पती यशवंत जाधव यांच्या नावावर 4.59 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये 1.72 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.