Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर बोलेरो पलटी होऊन 1 ठार, 9 मजूर गंभीर जखमी

Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर बोलेरो पलटी होऊन 1 ठार, 9 मजूर गंभीर जखमी

50
Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर बोलेरो पलटी होऊन 1 ठार, 9 मजूर गंभीर जखमी
Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर बोलेरो पलटी होऊन 1 ठार, 9 मजूर गंभीर जखमी

एचजी इन्फो स्ट्रक्चर चे 10 मध्य प्रदेशातील मजूर रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी चांदूर बाजार येथील एच जी च्या प्लांट वरून मोर्शी कडे घेऊन जात असताना खानापूर ते आष्टगाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू पिकअप क्रमांक एम एच 27 एक्स 8601 पलटी होऊन एक मजूर घटनास्थळी ठार झाला तर 9 मजूर जखमी झाले आहे. (Accident News)

हेही वाचा-Jammu and Kashmir : किश्तवाड चकमकीनंतर सापडलेल्या वस्तूंवर पाकिस्तानचा पत्ता !

जमलेल्या नागरिकांनी एच.जी कंपनीची मालवाहू पिकअप खाली दबलेल्या मजुराला मालवाहू पिकअप सरळ करून अन्य 9 जखमींना बाहेर काढले. या अपघातात मध्य प्रदेशातील राकेश पाटील वय 22 वर्ष हा घटनास्थळी ठार झाला. गंभीर जखमींचे नावे खालील प्रमाणे आहे. (Accident News)

हेही वाचा- Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश !

पप्पू काजदे, वय 20 वर्ष, राजा काजळे यांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी अमरावती रवाना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्य जखमींची नावे मुजा कासदे, सुनील कासदे, रंगभाऊ श्रीपाद यादव, सालक राम सालवे, लालसिंग कासदे, अर्जुन चिराले राहणार सर्व मध्यप्रदेश हे गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सचिन कोरडे यांनी उपचार केले. अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.