मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना (Panna) जिल्ह्यात सरकारी जमिनीवर सुमारे ३० वर्षांपासून कब्जा करून एक बेकायदेशीर मदरसा (Madrasa) बांधण्यात आला होता. पण वक्फ कायदा लागू होताच, संचालकाने स्वतः दि. १२ एप्रिल रोजी हा मदरसा पाडून टाकला. (Waqf Act)
( हेही वाचा : Accident News : आष्टगाव ते खानापूर मार्गावर बोलेरो पलटी होऊन 1 ठार, 9 मजूर गंभीर जखमी)
या बेकायदेशीर मदरशाचा (Madrasa) बराच काळ विरोध होत होता. या मदरसांच्या नावाने मोठ्या प्रमाणात देणग्याही गोळा केल्या जात होत्या. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पन्ना (Panna) जिल्ह्यातील बीडी कॉलनीमध्ये (BD Colony) असलेल्या बेकायदेशीर मदरशाबाबत प्रशासन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार विष्णू दत्त शर्मा (Vishnu Dutt Sharma) यांच्याकडे तक्रार करण्यात आली. (Waqf Act)
तक्रारीनंतर, एसडीएमने मदरसा (Madrasa) संचालकाला नोटीस बजावली होती. प्रशासनाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच, संचालकाने मजूर कामावर ठेवून आणि बुलडोझर बोलावून मदरसा पाडला. मदरसा संचालक अब्दुल रौफ कादरी (Abdul Rauf Qadri) म्हणतात की, त्यांनी गाव पंचायतीकडून परवानगी घेतली होती. पण आता हा परिसर महानगरपालिकेच्या अखत्यारीत आला आहे, त्यामुळे बांधकाम बेकायदेशीर ठरले होते. (Waqf Act)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community