…तरीही Tanker चालकांचा संप कायम, महापालिकेने उचलले हे कडक पाऊल

855
विहीर अधिग्रहीत करण्याच्या निर्णयानंतर Tanker मालक नरमले; आयुक्तांच्या चर्चेनंतर संप मागे
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली. असे असूनही टँकर (Tanker) चालक संप मागे घेत नसल्याने, व्यापक जनहित लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित अर्थात ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे.

WhatsApp Image 2025 04 13 at 7.18.34 PM

मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बजावलेल्या नोटिशींना १५ जून २०२५ पर्यंत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी स्थगिती दिली. तरीही टँकर मालकांनी संप कायम ठेवला आहे, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रमाणित कार्यपध्दती जारी केली आहे. महापालिकेने जारी केलेल्या एसओपीनुसार, प्रत्येक विभाग कार्यालयात पाण्याचे टँकर्स, तसेच टँकर्स भरण्याची ठिकाणे यांच्या संख्येनुसार आवश्यक त्या परिवहन निरीक्षकांची संख्या ही महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी खात्याकडून निश्चित केली जाईल. ती संख्या परिवहन आयुक्त यांना कळविण्यात येईल. जेणेकरून परिवहन खात्याकडून तेवढे मनुष्यबळ विभाग कार्यालय स्तरावर नियुक्त केले जाईल असे नमुद केले आहे.

(हेही वाचा – दहिसरमध्ये UBT Shiv Sena ला मोठा धक्का, उपनेत्या तसेच माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश)

ज्या खासगी गृहनिर्माण संस्थांना पाण्याचे टँकर हवे असतील त्यांनी विभाग कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्र (CFC) येथे मागणी नोंदवून आवश्यक रकमेचा भरणा करावा. ती पावती पथकांकडून टँकर भरण्याच्या ठिकाणांवर दिली जाईल. या खासगी गृहनिर्माण संस्थांना दैनंदिन किती पाणी पुरवले जात होते, किती टँकर्सची आवश्यकता होती, याबाबतचा पुरावा त्यांनी टँकरधारकांकडून सादर करणे आवश्यक असेल. तसेच, पाणी भरण्याच्या ठिकाणी टँकर पाठविण्यात येईल. टँकर भरून झाल्यानंतर तो संबंधित गृहनिर्माण संस्थेकडे रवाना करण्यात येईल. टँकर भरण्याच्या प्रत्येक ठिकाणी स्थानिक पोलीस स्थानकाकडून आवश्यक ते पोलीस संरक्षण पुरविण्यात येईल,असे एओपीमध्ये नमुद केले आहे.

प्रचलित पद्धतीनुसार, संबंधित खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) टँकर पुरवठादारांना जी रक्कम देतात, तेवढी रक्कम अधिक २५ टक्के प्रशासकीय शुल्क, एवढी रक्कम संबंधित गृहनिर्माण संस्थेला महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर रोख अथवा यूपीआय पेमेंट (UPI Payment) या दोनपैकी कोणत्याही एका स्वरुपात भरता येईल. तसेच संबंधित गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणीपुरवठा केल्यानंतर, टँकर धारकाने महानगरपालिकेच्या पथकाकडे पावती सादर करावी. त्या पावती आधारे महानगरपालिकेचे लेखा अधिकारी योग्य त्या रकमेचे अधिदान टँकरचालकांना करतील.

या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार गठीत करण्यात आलेली पथके ही सदर कार्यवाही सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. महानगरपालिकेचे परिमंडळीय सहआयुक्त / उपआयुक्त तसेच मुंबई पोलीस दलाचे परिमंडळीय उपआयुक्त यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीवर देखरेख करुन सदर कार्यपद्धती सुरळीतपणे पार पडेल, याची खातरजमा करावी. तसेच, या प्रमाणित कार्यपद्धतीमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार लहान बदल तथा सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) व अतिरिक्त आयुक्त (शहर) यांचेशी सल्लामसलत करुन यथायोग्य बदल करण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.