-
ऋजुता लुकतुके
फोक्सवॅगन कंपनीने अलीकडे भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन कंपनीने आपल्या टायगन (Volkswagen Taigun 2025) या एसयुव्ही चे दोन नवीन प्रकार भारतात लाँच करायचं ठरवलं आहे. यातला एक आहे टायगन १.५ टीएसआय जीटी प्लस स्पोर्ट. आणि दुसरा टायगन १.० एटी जीटी लाईन. यातील पहिली एसयुव्ही नावाप्रमाणेच स्पोर्ट्स म्हणजे कामगिरीवर भर देणारी आहे. तिचं डिझाईन आणि लुकही थोडा स्पोर्टी आहे. (Volkswagen Taigun 2025)
आणि त्याचबरोबर कंपनी आपल्या पारंपरिक टायगन गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जनही या वर्षअखेर बाजारात आणणार आहे. जागतिक स्तरावर या गाडीने आपलं पदार्पण केलं आहे. पण, भारतात मात्र त्यासाठी थोडा वेळ आहे. आधीच्या टायगनच्या तुलनेत या गाडीतील फिचर (Feature) नवीन आणि चमकदार असतील. सनरुफ, आधुनिक डिस्प्ले आणि बदललेलं इंटिरिअर ही काही ठळक वैशिष्ट्य सांगता येतील. (Volkswagen Taigun 2025)
(हेही वाचा – Racist : पुरोगाम्यांचे भावविश्व!)
गाडीच्या आत डोकावलंत तर सीट्सवरील लेदर आवरणाला काळ्या रंगाबरोबरच लाल रंगाचं स्टिचिंग असेल. ॲल्युमिनिअम पेडल्स आणि पूर्ण काळ्या रंगाचा नवीन डॅशबोर्ड. तर स्टिअरिंग व्हीलला काळ्या रंगात गुंफलेला लाल रंग असे बदल कंपनीने जीटी प्लस स्पोर्ट्स गाडीत केले आहेत. (Volkswagen Taigun 2025)
Love always takes the front seat when you’re in a Volkswagen.#HappyValentinesDay
[Valentines Day 2025, Volkswagen Taigun, Volkswagen Virtus, Volkswagen India, Volkswagen, Volkswagen cars, Fun, Safety, Comfort cars] pic.twitter.com/4Vsvgqu2ea
— Volkswagen Landmark (@vwlandmark) February 14, 2025
(हेही वाचा – Water Tankers : राजकीय पक्षांना टँकर लॉबीचा पुळका!)
इंजिनासाठी ग्राहकांना दोन पर्याय मिळतील. पहिला पर्याय असेल तो १.०, ३ सिलिंडरच्या टर्बो पेट्रोल इंजिनाचा. हे इंजिन ११४ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. तर दुसरा पर्याय असेल तो १.५, ४ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिनाचा. ही गाडी १४८ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकते. १.५ टर्बो इंजिन हा टायगन गाडीचा युएसपी असेल. यात ६ गिअरचा मॅन्युअल आणि ७ गिअरचा स्वयंचलित गिअरबॉक्स असे दोन पर्याय असतील. (Volkswagen Taigun 2025)
चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत टायगन इतर कंपन्यांच्या एक पाऊल पुढे आहे. गाडीत ज्येष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांच्या सुरक्षेचीही काळजी घेतल्याचा दावा कंपनीने केला आहे. ६ एअरबॅग्ज बरोबरच टायगनमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यंत्रणा बसवण्यात आली आहे. टायगन २०२५ ची किंमत भारतात १२ लाख रुपयांपासून सुरू होईल. (Volkswagen Taigun 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community