- ऋजुता लुकतुके
भारतात आयपीएलचा (IPL) जलवा सुरू असताना या आठवड्यातच पाकिस्तानमध्ये पीएसएल अर्थात, पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरू झाली आहे. या लीगमध्ये क्रिकेट तसंच आंतरराष्ट्रीय राजकारण एक झालेलं पाहायला मिळत आहे. लीगमधील एक संघ मुलतान सुलतानने (Multan Sultans) एक घोषणा केली आहे. संघातील खेळाडूंनी लागवलेला प्रत्येक षटकार आणि प्रत्येक बळीमागे फ्रँचाईजी मालक एक लाख पाकिस्तानी रुपये वेगळे काढणार आहेत. आणि ही रक्कम पॅलेस्टाईनमधल्या (Palestine) लोकांना दान करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
पीएसएल (Pakistan Super League) या लीगचं यंदाचं हे दहावं वर्षं आहे. पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये या स्पर्धेला महत्त्वाचं स्थान आहे. लोकांचा तसंच चाहत्यांचा या लीगला चांगला प्रतिसाद मिळतो. हे पाहूनच फ्रँचाईजी मालकांनी ही घोषणा केली आहे. ‘मुलतान सुलतान (Multan Sultans) संघाने यंदा ठरवलंय की, आम्ही पॅलेस्टाईनमधील (Palestine) जनतेसाठी दानधर्म करणार आहोत. जेव्हा आमचा एखादा फलंदा षटकार ठोकेल, तेव्हा आम्ही पॅलेस्टाईनमधील लोकांना १,००,००० रुपये दान करू,’ असं संघमालक अलीखान तरीन (Ali Khan Tareen) यांनी जाहीर केलं आहे.
(हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त Raj Thackeray यांचा कडून संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या योगदानाचे स्मरण)
Breaking News
Multan Sultans announced 1 Lakh Rupees for Palestine on every Six and Every Wicket in PSL X
What Wonderful Gesture by Ali Tareen pic.twitter.com/lRH0z5TMRb
— ٰImran Siddique (@imransiddique89) April 12, 2025
(हेही वाचा – …तरीही Tanker चालकांचा संप कायम, महापालिकेने उचलले हे कडक पाऊल)
आमच्या गोलंदाजांनाही यात सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी त्यांच्यासाठीही आम्ही योजना आणली आहे. गोलंदाजाने मिळवलेल्या प्रत्येक बळीसाठी आम्ही १,००,००० रुपये दान करणार आहोत. ही रक्कम खासकरून पॅलेस्टाईनमधील मुलांच्या कल्याणासाठी वापरली जाईल. शुक्रवारी रावळपिंडी इथं या लीगला सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच आयपीएल (IPL) आणि पीएसएल एकाच वेळी होत असल्यामुळे पीएसएल लीगच्या आयोजकांनी सामन्यांच्या वेळा अर्ध्या तासाने पुढे ढकलल्या आहेत. पीएसएलचे सामने पाकिस्तानी वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहेत. (Pakistan Super League)
रावळपिंडी, कराची आणि लाहोर या नुकत्याच नुतनीकरण करण्यात आलेल्या स्टेडिअममध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. एरवी मार्च ते एप्रिल महिन्यात पीएसएल लीग होते. पण, यंदा या दरम्यान पाकिस्तानमध्येच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं आयोजन पार पडलं. त्यामुळे पीएसएल पुढे ढकलावी लागली आहे. आणि आता नेमकी आयपीएलच्या काळातच ती होणार आहे. (Pakistan Super League)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community