Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, “बॉम्बने उडवू …”

Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, "बॉम्बने उडवू ..."

43
Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले,
Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, "बॉम्बने उडवू ..."

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमानला वारंवार बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खानला बॉम्बनं गाडी उडवून देण्याची धमकी आली आहे. (Salman Khan)

हेही वाचा-PM Narendra Modi यांनी प्रेरणा स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली !

मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर सलमानला (Salman Khan) जीवे मारण्याचा धमकीजा मेसेज करण्यात आला आहे. बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देऊ त्याबरोबरच सलमानला घरात घुसून मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई गँगकडून देण्यात आली आहे का? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Salman Khan)

प्रकरण काय ?
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमानला वारंवार बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून येणाऱ्या धमक्या पाहता अभिनेत्याच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली असून गेली कित्येक महिने सलमान खान कुठेही जाताना सुरक्षारक्षकांसोबतच मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिसतो. सलमान खानच्या वांद्रे येथील घरालाही सुरक्षारक्षकांचा घेराव असल्याचं पाहायला मिळतो. (Salman Khan)

हेही वाचा- ICC Initiative : अफगाणिस्तानातील महिला क्रिकेटपटूंच्या पुनर्वसनासाठी आयसीसीचा पुढाकार

तर, वांद्र्यातील गॅलेक्सीमधील घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. अशातच नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. (Salman Khan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.