IPL 2025, Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडचा बदली खेळाडू आयुष म्हात्रे?

मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वीच तो चेन्नईच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो.

61
IPL 2025, Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडचा बदली खेळाडू आयुष म्हात्रे?
IPL 2025, Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडचा बदली खेळाडू आयुष म्हात्रे?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईचा १७ वर्षीय तडाखेबाज सलामीवीर आयुष म्हात्रेला (Ayush Mhatre) यंदा आयपीएलचं (IPL 2025) तिकीट मिळू शकतं. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) रिकामी झालेली जागा आयुष भरून काढणार असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. इतकंच नाही तर येत्या २० तारखेला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वीच तो चेन्नईच्या ताफ्यात दाखल होईल, अशी शक्यता आहे. ३ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) फ्रँचाईजीने आयुष म्हात्रेला (Ayush Mhatre) नेट्समध्ये चाचणीसाठी बोलावलं होतं. तिथून आयुष म्हात्रेच्या समावेशाची चर्चा सुरू झाली होती.

जेद्दाह इथं झालेल्या मेगा लिलावात आयुषवर बोली लागली नव्हती. पण, मुंबईचा संघ रणजीत उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला. तेव्हा बाद फेरीत आयुषने दिमाखदार शतक झळकावलं होतं. त्यातच चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) झालेल्या कोपराच्या दुखापतीनंतर चेन्नईला सलामीवीराचीच गरज आहे. ती जागा आता आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) भरून काढणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंत हा हंगाम विसरण्यासारखा गेला आहे. ६ सामन्यांमध्ये संघ फक्त १ सामना जिंकू शकला आहे. त्यातच गायकवाडच्या दुखापतीमुळे संघाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी सांभाळत आहे. पण, त्यानंतरही संघाचं नशीब पालटलं नाही. (IPL 2025, Ayush Mhatre)

(हेही वाचा – Ambedkar Jayanti 2025 : सावरकर आणि आंबेडकर – विचार आणि कार्यातील साम्यता)

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नईचा संघ २० षटकांत ९ बाद १०३ धावाच करू शकला. संघ सातत्याने हरतोय. आणि संघाचे पराभवही मोठे आहेत. त्यातच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) चेंडू कोपरावर बसून ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) दुखापत झाली होती. त्यानंतरही त्याने फलंदाजी केली.  त्या सामन्यात त्याने ६३ धावा केल्या. तर हात दुखत असताना आणखी दोन सामने तो खेळला. यात त्याने अनुक्रमे ५ आणि १ धाव केली. पण, दुखापत वाढून कोपराचं हाड काहीसं मोडल्याचं निदान झालं. आणि त्यानंतर ऋतुराजला आता उर्वरित हंगाम खेळता येणार नाहीए. (IPL 2025, Ayush Mhatre)

तर आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) मुंबईकडून यंदा आपला पहिला रणजी हंगाम खेळला आहे. आणि यात त्याने ७ सामन्यांत ६२ धावांच्या सरासरीने ४५८ धावा केल्या आहेत. तर विजय हजारे चषकातही त्याच्या नावावर ४७१ धावा आहेत. महाराष्ट्राविरुद्ध १७६ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. १७ वर्षांचा असल्यामुळे त्याच्याकडे भारताचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. (IPL 2025, Ayush Mhatre)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.