ST चा प्रवास आणखी महागणार? साफसफाई अधिभारामुळे प्रवाशांवर नवीन बोजा

62
ST चा प्रवास आणखी महागणार? साफसफाई अधिभारामुळे प्रवाशांवर नवीन बोजा
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेची जीवनरेषा असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना लवकरच तिकिटांच्या दरवाढीचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांच्या खिशावर नवीन साफसफाई अधिभाराचा भार पडण्याची चिन्हे आहेत. वाहतूक विभागाने एसटी (ST) बसच्या तिकिटांवर साफसफाई कर लादण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून एसटीच्या प्रवाशी संख्येत लक्षणीय घट झाली आहे, ज्याचा थेट परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. यंदा २५ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 14.95 टक्क्यांची भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या निर्णयाला जनतेने तीव्र विरोध दर्शवला, तरीही भाडेवाढ मागे घेण्यात आली नाही. आता नवीन प्रस्तावानुसार, प्रत्येक तिकिटावर एक रुपयाचा साफसफाई अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांचा आर्थिक बोजा आणखी वाढणार आहे. (ST)

(हेही वाचा – Ambedkar Jayanti 2025 : सावरकर आणि आंबेडकर – विचार आणि कार्यातील साम्यता)

एसटी (ST) महामंडळाला शासनाकडून अनुदान आणि परतावा वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, डिझेलच्या किमती, देखभाल खर्च आणि कर्मचारी भत्त्यांमुळेही महामंडळावर आर्थिक दबाव आहे. साफसफाई अधिभाराच्या प्रस्तावामुळे बसगाड्यांची स्वच्छता सुधारेल, अशी अपेक्षा असली, तरी प्रवाशांमध्ये याबाबत नाराजी पसरत आहे. एका प्रवाशाने सांगितले, “आधीच तिकीट महाग झाले आहे, आता अधिभार लादून सामान्य माणसाला आणखी त्रास दिला जात आहे.”

या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु तो लागू झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या दररोज लाखो प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी (ST) महामंडळाला उत्पन्नवाढीसाठी पर्याय शोधावे लागत आहेत. मात्र, प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणीही जोर धरत आहे. याबाबत परिवहन मंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.