तब्बल ४१५ कोटी रुपये खर्च करून बांधलेले ज्योतिबा फुले रुग्णालय BMC स्वत: चालवणार की खासगी संस्थेला देणार?

485
तब्बल ४१५ कोटी रुपये खर्च करून बांधलेले ज्योतिबा फुले रुग्णालय BMC स्वत: चालवणार की खासगी संस्थेला देणार?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या (BMC) क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुगालयाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी तब्बल ४१५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, एका बाजूला तब्बल एक हजार कोटी रुपयांचा खर्च करून उभारले जाणारे भगवती रुग्णालय सार्वजनिक खासगी सहभाग अर्थात पीपीपी तत्वावर देण्याचा घाट घालण्यात आला आहे, तिथे आता तब्बल ४१५ कोटी रुपये खर्च करण्यात येणारेही महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयही जर पीपीपी तत्वावर दिले जाणार असेल तर मग महापालिका या रुग्णालयावर एवढा पैसा का खर्च करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. (BMC)

(हेही वाचा – Gold Smuggling : दिव्यांग प्रवाशाच्या बुटात सापडले कोट्यवधींचे सोने)

विक्रोळी पूर्व येथील हरियाली गाव कन्नमवार नगर येथे ९५६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर महापालिकेच्यावतीने (BMC) सर्वसाधारण रुग्णालय तसेच कर्मचारी निवास इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. क्रांतिवीर महात्मा जोतीबा फुले मनपा सर्वसाधारण रुग्णालयाची क्षमता १४० खाटांची होती. रुग्णालयातील अनेक सुविधा अपुऱ्या व जुन्या होत्या. या रुग्णालयाची इमारत तळमजला अधिक दोन मजले इतकी होती. या रुग्णालयाची इमारत ही स्ट्रक्चरल ऑडीट अहवालाच्या अनुषंगाने वापरास योग्य नसल्याने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालयाची इमारत ३० वर्षापेक्षा जुनी व जीर्ण अवस्थेत असल्याने रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच रुग्णांना जास्तीत जास्त अद्ययावत सुविधा पुरविण्याकरिता सदर रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. (BMC)

(हेही वाचा – Tamil Nadu च्या राज्यपालांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा; स्टेट युनिफॉर्म स्कूल सिस्टीम फोरमला पोटशूळ)

यामध्ये रुग्णालयाच्या पुनर्विकासात रुग्णालयीन वापरा करता तळ अधिक १३ मजली इमारत आणि तळ अधिक २१ मजली तिन विंग असलेल्या इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेत याबाबतच्या पुनर्विकासाला मंजुरी देण्यात आली आहे. या पुनर्विकासाच्या कामासाठी महापालिकेच्यावतीने (BMC) सुमारे ४१५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी ऐस कॉर्पोरेशनची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बांधकामासाठी २७० कोटी रुपये, विद्युत कामांसाठी १२१ कोटी रुपये आणि फर्निचर कामासाठी सुमारे २३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, एकाबाजुला भगवती रुग्णालयाचा पुनर्विकासा सन २००७पासून सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी सुमारे एक हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. पण महापालिकेच्या तिजोरीत पैसा खर्च करून खासगी संस्थांना या रुग्णालयीन इमारती उपलब्ध करून देण्याऐवजी महापालिकेने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर पीपीपी धोरणाचा अवलंब केल्यास महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचू शकतो आणि सध्याच्या पीपीपी धोरणानुसार महापालिकेच्या रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवून त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा भार महापालिका उचलेल. त्यामुळे यावरील खर्चाचा भार वाचेल आणि पीपीपी धोरणानुसार, महापालिका रुग्णांचा खर्च उचलल्याने वैद्यकीय सेवाही देता येणार आहे, तर मग महापालिकेने स्व खर्चाने रुग्णालये का बांधावीत. जर महापालिका स्वत: ही रुग्णालये चालवणार असतील तर ठिक आहे, परंतु महापालिकेने स्वत: खर्च करून या इमारती खासगी संस्थांना चालवण्यास देणे हे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता योग्य नसल्याचे काही निवृत्त अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.