Robert Vadra यांना ईडीचे पुन्हा समन्स, शिकोहपूर येथील जमिनीचे काय आहे प्रकरण?

61

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED Summons) पु्न्हा समन्स पाठवले आहे. त्यांना आज, १५ एप्रिल रोजी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी वाड्रा यांना 8 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होता. त्यानंतर १५ एप्रिल या दिवशी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. शिकोहपूर जमीन प्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाड्रा हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – Lokbandhu Hospital Fire : लोकबंधू रुग्णालयात भीषण आग; सर्व २०० रुग्ण सुखरूप)

केंद्रीय तपास यंत्रणेने (Central Bureau of Investigation) गेल्या वर्षी मनी लॉड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांनी यापूर्वी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलवले होते. पण ते त्या वेळी हजर झाले नाही. त्यामुळे ईडीने त्यांना कार्यालयात हजर रहाण्यासाठी पुन्हा समन्स पाठवले.

केंद्रीय तपास यंत्रणा वाड्रा यांच्या स्काईलाईट हॉस्पिटॅलिटीशी (Sky Light Hospitality) संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तपास करत आहेत. नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाड्रा (Robert Vadra) एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेशाची इच्छा जाहीर केली. लोकांची इच्छा असेल, तर आपण पूर्ण ताकदीने उतरून काम करू असे ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.