
Nitin Gadkari : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) कामात भरपूर अडचणी आल्या आहेत. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दादरच्या अमर हिंद मंडळाने (Amar Hind Mandal) आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते. (Nitin Gadkari)
(हेही वाचा – लहान मुलांच्या तस्करीवर Supreme Court ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे)
देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल. चीनमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट ८ टक्के आहे. युरोपातील देशांत ११ टक्के आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट सध्याच्या दोन अंकी म्हणजेच जवळपास १६ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर येत्या जानेवारीपर्यंत आणली जाईल, असे गडकरी म्हणाले.
(हेही वाचा – गरज पडली तर बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींना त्यांची जागा दाखवू – नवनीत राणा | Navneet Rana)
नवी मुंबई विमानतळाकडे वॉटर टॅक्सी जाणार
मुंबईमधील (Mumbai) कोणत्याही दिशेकडून जलमार्गाने १७मिनिटात नवी मुंबई विमानतळाकडे (Navi Mumbai Airport) जाता यावे यासाठी वॉटर टॅक्सीची (Water Taxi) योजना तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तसेच वसई विरारपासून ते गेटवे ऑफ इंडिया या कोणत्याही ठिकाणाहून या नवी मुंबई विमानतळाकडे जाता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले. वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी नवे १०८ जलमार्ग (108 waterways) तयार केले जाणार असून, त्यातील दोन जलमार्ग सुरू झाले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community