कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर कारवाईचे कामगारमंत्री Akash Fundkar यांचे निर्देश

89
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर कारवाईचे कामगारमंत्री Akash Fundkar यांचे निर्देश
  • प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त मोहीम राबवून कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने गोळा करून आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी दिले. यात स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधींचाही समावेश करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Cabinet Decision : नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मालमत्ता भाडेपट्टा नियमांत सुधारणा; नवीन दरांना मंत्रिमंडळाची मंजुरी)

कुरकुंभ येथील अल्कली अमाइन्स कंपनीत नुकत्याच झालेल्या स्फोटानंतर निर्माण झालेल्या परिस्थिती आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार राहुल कुल, एमआयडीसी अधिकारी, रासायनिक उद्योगांचे प्रतिनिधी, पर्यावरण आणि कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फुंडकर यांनी रासायनिक उद्योगांच्या संख्येमुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी विशेष उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी स्वतंत्र पथक गठित करून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले. (Akash Fundkar)

(हेही वाचा – Cabinet Decision : कैद्याचा कोठडीत मृत्यू झाला तर सरकार देणार भरपाई)

आमदार राहुल कुल यांनी कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) संदर्भात मुद्दा उपस्थित करत, प्रदूषित पाणी निर्माण करणारे उद्योगच सीईटीपी चालवत असल्याने प्रभावी नियंत्रण होत नसल्याचे नमूद केले. यावर फुंडकर यांनी धोरणात्मक फेरआढावा आणि संयुक्त पाहणीचे निर्देश दिले. तसेच, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गत फायर ऑडिट नियम तातडीने लागू करण्यासाठी उद्योग विभागाशी समन्वय साधण्याचे आदेश दिले. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी कामगार विभागाकडे नसली, तरी संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Akash Fundkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.