मुंबई योग्य दिशेने आणि वेगाने…; Dr. Bhushan Gagrani यांनी दिले दाखले

757
BMC : दरदिवशी तीन मजल्याच्या इमारतीएवढा कचरा करतात मुंबईकर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई मुंबईच राहिली पाहिजे. अत्याधुनिक सुविधांचा विचार व्हायला पाहिजे. सन १८६१ ते लंडनमध्ये पहिली मेट्रो रेल्वे बांधायला सुरुवात झाली. आज लंडनमध्ये सुमारे ४०० किमी लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे आहे. त्यातुलनेत मुंबईत २०१४ मध्ये मेट्रो रेल्वे करण्याचा विचार झाला आणि आज मुंबईत सुमारे ३७५ किलोमीटर तयार होत आहे. त्यामुळे रस्ते, पूल आदींसह आधुनिक दळणवळणसह इतर मूलभूत सुविधा तसेच व्यवस्था जागतिक दर्जाच्या देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही काळापूर्वी आपण मागे पडलो होतो, पण आता मुंबई योग्य दिशेने आणि वेगाने चालली आहे. मुंबईचे मुंबईपण टिकवून या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) यांनी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – भारताला आर्थिक महासत्ता करायचे असेल तर गाव-खेड्यांचा विकास करा; Nitin Gadkari यांचे महत्त्वाचे विधान)

दादर येथील अमर हिंद मंमंडळाच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंफताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) हे बोलत होते. भूषण गगराणी यांनी रस्ते, पूल, पाणी, मलनिःसारण वाहिनी, मलजल प्रक्रिया केंद्र, कचरा आणि त्याची विल्हेवाट तसेच त्यावर आकारल्या जाणाऱ्या प्रस्तावित कचरा कर, आरोग्य व्यवस्था आणि रुग्णालय खासगी संस्थेला देण्याचा पर्यंत तसेच पदपथ ते फेरीवाला आणि बेस्ट आदी विषयांवर विस्तृत मुद्दे मांडले. यावेळी बोलतांना मुंबईकरांना चांगल्या सेवा देण्यासाठी मुंबई महापालिका सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Shivsena UBT ला धक्का; माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा BJP मध्ये प्रवेश)

मुंबई महापालिकेचे एक किंवा दोन महापालिका करून त्याचे विकेंद्रीकरण करण्याचा कुणाचीही विचार मनात नसून तसे मुंबईचे तुकडे करणे शक्य नाही होणार असे त्यांनी मुलाखतकार यांनी मुंबई महापालिकेच्या विकेंद्रीकरण बाबत विचारलेल्या प्रश्नावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. मुंबईत डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्यामुळे वास येतो, पण आधी डम्पिंग ग्राउंड होते की लोकवस्ती हा प्रश्न त्यांनी निर्माण करत भविष्यात कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कचरा कर केवळ आपण निर्माण करत असलेल्या कचऱ्याची जाणीव करून देण्यासाठी आकारला जाणार आहे.तसेच मुंबईकरांना पुढील दोन वर्षात दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देतानाच चालण्यासाठी पदपथ उपलब्ध करून दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. (Dr. Bhushan Gagrani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.