मुंबई (विशेष प्रतिनिधी)
खड्डेमुक्त रस्त्यांवर कायमस्वरूपी इलाज म्हणजे सिमेंट काँक्रिटचे (Cement concrete Road) रस्ते होय. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला. आता सिमेंट काँक्रिटचे रस्ते केल्यानंतर कोणताही रस्ता खोदला जाणार नाही आणि रस्त्यांवर खड्डे उद्भवणार नाही. खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्ते करताना गुणवत्तेशी तडजोड कदापि खपवून घेतली जात नाही, असा इशाराच उप मुख्यमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, कमी गुणवत्तेचे काम करणा-या कंत्राटदारांना महानगरपालिकेने ३ कोटी ५० लाख रूपयांचा दंड आतापर्यंत आकारला आहे. यापुढे देखील कोणताही कंत्राटदार चुकीचे काम करत असेल तर त्यास अपात्र केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Cement concrete Road)
पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत व रस्ते वाहतूकयोग्य करावेत. मॅनहोल, रस्त्यांलगतचे सांडपाणी वाहिन्यांची प्राधान्याने स्वच्छता करावी असे निर्देश देखील यासमयी दिले. आगामी पावसाळ्यापूर्वी नागरिकांना अपघातमुक्त, खड्डेमुक्त असा सुखकर आणि सुरक्षित प्रवास… https://t.co/iQc3AqcoIW pic.twitter.com/G5cXnikDjS
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 15, 2025
मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची काँक्रिटीकरण कामे दोन टप्प्यांमध्ये सुरू आहेत. उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे विभागातील काँक्रिट रस्ते कामांची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. (Cement concrete Road)
📍 #मुंबई |
आज एक विशेष दौरा करून मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी केली व कॉंक्रिटीकरणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रस्तांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.… pic.twitter.com/8JGfkZCq7w
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 15, 2025
कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Cement concrete Road)
खड्डेमुक्त रस्ते प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नियोजन आहे. काँक्रिटीकरणाची कामे दर्जेदार व्हावीत, गुणवत्तेशी तडजोड केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत. मनुष्यप्रवेशिकांची (मॅनहोल), रस्त्यांलगतच्या सांडपाणी वाहिन्यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असेही निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. (Cement concrete Road)
हेही वाचा- रुग्णालयातून बाळ चोरीस गेल्यास परवाना रद्द होणार ; Supreme Court चे राज्य सरकारला निर्देश
काँक्रिट रस्ते करताना पर्यावरणाला बाधा पोहोचेल, हानी पोहोचेल असे कोणतेही काम करू नये. झाडांचे संगोपन योग्य पद्धतीने करावे. गोलाकार आळे करावे आणि संरक्षक जाळ्यादेखील बसवाव्यात, पावसाळ्यात स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वृक्षारोपण मोहीम राबवावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले. (Cement concrete Road)
हेही वाचा- मुंबईत पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा; DCM Eknath Shinde यांचे निर्देश
पाहणी दौऱ्याची सुरुवात दुपारी ए विभागातील बॉम्बे हॉस्पिटल जवळील चौक येथून झाली. त्यानंतर, सी विभागातील आर. एस. सप्रे मार्ग; एफ उत्तर विभागातील माटुंगा परिसरातील जामे जमशेद मार्ग आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातील मार्ग क्रमांक २१ इत्यादी रस्ते कामांची पाहणी उप मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच, स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. (Cement concrete Road)
हेही वाचा- कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर कारवाईचे कामगारमंत्री Akash Fundkar यांचे निर्देश
अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त सामूहिक जबाबदारीने कामकाज करत आहेत. अपेक्षेप्रमाणे रस्ते गुणवत्तापूर्ण व्हावेत, यासाठी महानगरपालिका अधिकारी कार्यरत आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सन्मान करण्यात येईल.तर, जे अधिकारी दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही शिंदे यांनी नमूद केले. (Cement concrete Road)
हेही वाचा- काळू धरणाला गती देण्याचे DCM Eknath Shinde यांचे निर्देश
रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी जिओ पॉलिमर, सिमेंट कॉंक्रीट, इन्फ्रा रेड, मायक्रो सर्फेसिंग, मास्टिक यांचा योग्य तो वापर करावा. नागरिकांना त्रास होणार नाही, रस्त्यांवर पाणी साचणार नाही, वाहन चालविणे सोयीचे होईल, यासाठी अधिक प्रयत्न करावेत.पदपथ, मनुष्यप्रवेशिकांची (मॅनहोल), रस्त्यालगतच्या सांडपाणी वाहिन्या यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असे निर्देशही उप मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Cement concrete Road)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community