-
ऋजुता लुकतुके
सामना सुरू असताना फलंदाजांची बॅट तपासून पाहण्याचा सिलसिला आयपीएलमध्ये सुरूच आहे. मैदानावर बॅट तपासली जात असताना राजस्थानचा खेळाडू रियान परागचं बुधवारी पंचांचीश भांडण झालं. रियानची बॅट पंचांकडे असलेल्या बॅटगेटमधून पार झाली नाही. परागने आपली नाराजी पंचांकडे उघड केली. पण, शेवटी त्याचा नाईलाज झाला आणि त्याला बॅट बदलून खेळावं लागलं. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात दिल्लीच्या १८८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे बाद झाल्यानंतर रियान मैदानात उतरला होता. त्याने स्ट्राईकही घेतला. आणि अचानक पंचांनी त्याच्याकडे बॅट मागितली. (IPL Bat Check)
बॅट निकषात बसत नाही म्हटल्यावर पराग काहीसा चिडलेला दिसला. पंचांबरोबर वाद घालत असल्याचं कॅमेरांनीही टिपलं. काही मिनिटांनी वातावरण निवळलं. परागवर याचा परिणाम झाला असावा. कारण, ११ चेंडूंत ८ धावा करून तो बादही झाला. (IPL Bat Check)
(हेही वाचा – IPL 2025, Bat Check : आयपीएलमध्ये सुनील नरेन, एनरिक नॉर्खिया यांची बॅट चाचणी फेल, बॅट बदलून खेळण्याचे निर्देश)
The umpires are doing their job and #RiyanParag’s bat is under scrutiny! 🧐
Watch the LIVE action ➡ https://t.co/nbBEFOkjkM #IPLonJioStar 👉 #DCvRR | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/o68pxrSrje
— Star Sports (@StarSportsIndia) April 16, 2025
एखाद्या फलंदाजाला बॅट बदलावी लागण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी सोमवारी कोलकाताचे दोन फलंदाज सुनील नरेन आणि एनरिक नॉर्किए यांनाही आयपीएलच्या निकषात न बसल्यामुळे बॅट बदलावी लागली होती. त्यानंतर राजस्थानच्या रियान परागची बॅटही बदलावी लागली आहे. मैदानावर बॅट तपासणी जाणं हे तर आता नित्याचं झालं आहे. प्रत्येक सामन्यात साधारण ३ ते ४ असे प्रसंग घडत आहेत. अर्थात, बॅटचा आकार नियमांत बसणारा नसेल तर त्यासाठी सध्या फलंदाज किंवा संघावर कुठलीही कारवाई होत नाहीए. फक्त फलंदाजांना बॅट बदलून येण्यास सांगितलं जात आहे. (IPL Bat Check)
आयसीसी आणि आयपीएलच्या नियमानुसार, बॅटची जास्तीत जास्त रुंदी १०.७ सेंटीमीटरची हवी. जाडी ६.७ सेमींची हवी आणि आणि बॅटच्या तळाची जाडी ही ४ सेंटींमीटरपेक्षा जास्त असता कामा नये. बॅटच्या तळाची जाडी जास्त असेल तर षटकार किंवा उंच फटके खेळणं सोपं जाऊ शकतं, त्यासाठी आयपीएल प्रशासनाने बॅट तपासण्याचा निर्णय घेतला आहे. (IPL Bat Check)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community