-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बोर्डर – गावसकर कसोटी मालिका भारताने १-४ अशी गमावली. यात कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माचं (Rohit Sharma) अपयश उठून दिसलं. त्याने १० धावांच्या सरासरीने या मालिकेत धावा केल्या होत्या. शिवाय तो खेळला की, अंतिम अकरामधून शुभमन गिलला (Shubman Gill) वगळावं लागत होतं. अखेर शेवटच्या सिडनी कसोटींत कर्णधार म्हणून रोहितने स्वत:लाच वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर रोहित (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याच बेबनाव झाल्याच्या बातम्याही मीडियामध्ये रंगल्या होत्या. पण, आता रोहित शर्माने एका पॉडकास्टमध्ये या सगळ्या घटनाक्रमावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे.
कसोटीतून स्वत:ला वगळण्याचा निर्णय आपल्या फलंदाजीचं अवलोकन केल्यावर आणि फॉर्म तपासून पाहिल्यावर संघहित लक्षात घेऊन घेतला, असं रोहित माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कशी (Michael Clarke) बोलताना म्हणतो. हा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना सांगितल्यावर दोघांचं त्यावर परस्परविरोधी मत होतं, असंही रोहितने म्हटलं आहे. भारतीय संघाने १० वर्षांनंतर यंदा बोर्डर – गावसकर मालिका गमावली. यात ५ डावांमध्ये मिळून फक्त ३१ धावा करणाऱ्या रोहित शर्माचं (Rohit Sharma) अपयश उठून दिसलं.
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात राजनाथ सिंह यांच्या हस्ते Maharana Pratap पुतळ्याचे अनावरण)
‘चेंडू माझ्या बॅटवर मधोमध येत नव्हता. आणि अशावेळी माझ्यापेक्षा जास्त तयारी असलेल्या फलंदाजाची जागा मला अडवायची नव्हती. मी याचा खूप विचार केला. मी स्वत:शी प्रामाणिक राहून विचार केला. इतर काही फलंदाज अडखळतायत म्हणून मी ही तसंच खेळत राहायचं याला काही अर्थ नव्हता,’ म्हणून मी तसा निर्णय घेतला असं रोहितने (Rohit Sharma) सांगितलं.
पण, त्याचवेळी हा निर्णय संघ प्रशासनाला सांगितल्यावर त्यांच्यात दुमत असल्याचंही रोहितने (Rohit Sharma) म्हटलं आहे. ‘मी आधी प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्षांशी बोललो. दोघांना माझं पटलं आणि पटलंही नाही. गंभीरना माझा निर्णय पटला. पण, आगरकरला मालिकेच्या मध्यात असं काहीतरी व्हावं असं वाटत नव्हतं. पण, मला गिलने खेळावं असं वाटत होतं. आधीची कसोटी फॉर्मात असून तो खेळू शकला नव्हता. आणि माझा फॉर्म चांगला नव्हता. त्यामुळेच मी मागे सरण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) त्या निर्णयानंतर रोहित कसोटीतून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण, त्याने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community