अजून एक स्वदेशी लस आली… 12 वर्षांवरील सर्वांना मिळणार ‘ही’ लस

159

कोरोनाविरुद्ध गेल्या वर्षभरापासून चालू असलेला लढ्यात आता भारताला आणखी एक यश आले आहे. झायडस कॅडिला या देशातील आघाडीच्या औषध निर्मिती कंपनीच्या ZyCov-D या लसीला परवानगी मिळाली आहे, भारतीय औषध महानियंत्रक(डीसीजीआय)कडून या लसीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत भात्यात आणखी एका शस्त्राची भर पडली आहे.

मुख्य म्हणजे ही लस संपूर्णपणे स्वदेशी असून, ती डीएनएवर आधारित जगातली पहिली लस आहे. या लसीला मिळालेल्या परवानगीमुळे आता भारतातील लसीकरण अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. ही लस 12 वर्षांवरील देता येणार आहे, असे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः राज्य शासनाकडूनच लसी कमी मिळतात… मुंबई महापालिकेने दिली माहिती)

12 वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

ZyCov-D या लसीला आपत्कालीन मान्यता मिळावी यासाठी झायडस कॅडिला या कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी कंपनीने डीसीजीआयकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. त्याच अर्जाला मंजुरी देत, डीसीजीआयने या लसीचा मार्ग मोकळा केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही लस 12 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना देता येणार असल्यामुळे, जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करण्यास याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढणार आहे.

(हेही वाचाः D-Mart च्या ‘त्या’ लिंकमध्ये ‘कुछ तो गडबड हैं’… सायबर पोलिसांनी दिला इशारा)

काय आहे लसीचा फायदा?

बिराक संस्थेच्या सहकार्याने झायडस कॅडिला कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करण्यात आला आहे. या लसीमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.