दांडी बहाद्दर पोलिसांसाठी आयुक्तांचा ‘हा’ मोठा निर्णय!

आजारी नसताना देखील सिक लिव्ह घेऊन खासगी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणून सादर करून भरपगारी रजा घेणाऱ्या अमलदारांना मुंबई पोलिस आयुक्तांनी चांगलाच झटका दिला आहे.

130

विनाकारण कामावर दांड्या मारणाऱ्या पोलिसांचा यापुढे पगार कापला जाणार असून त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त यांनी काढले आहे. पोलिस आयुक्तांच्या या आदेशानंतर दांडी बहाद्दर पोलिसांचे चांगलेच वांदे झाले आहेत.

मुंबई पोलिस आयुक्तांचा अमलदारांना झटका

विनाकारण कामावर गैरहजर राहणे, सिक लिव्ह (आजारपणाची), रजेच्या नावाखाली दांड्या मारण्याच्या प्रकारात मुंबई पोलिस दलात मोठी वाढ झाली होती. आजारी नसताना देखील सिक लिव्ह घेऊन खासगी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणून सादर करून भरपगारी रजा घेणाऱ्या अमलदारांना मुंबई पोलिस आयुक्तांनी चांगलाच झटका दिला आहे.

(हेही वाचा : ‘त्या’ देशात माता तान्ह्या मुलांना का फेकतायेत?)

न सांगता रजा घेणाऱ्यांचा पगार कापणार

या दांडेबहाद्दूर पोलिसांमुळे इतर पोलिसांचे वांदे होत होते, अनेक जण तर एक एक महिना कामावर न येता वेतन घेत होते. अशांना धडा शिकवण्यासाठी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिस पत्रकात आदेश जारी केले आहेत. जो अमलदार विनाकारण न सांगता रजा घेईल त्याचा त्या दिवसांचा वेतनातून पैसे कापले जाणार आहे, तसेच ज्या अमलदाराने रुग्णनिवेदन (सिक रजा) केले आहे व त्याने घेत असलेल्या आजाराचे वैद्यकीय कागदपत्रे अथवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले नाही, त्याच्या मासिक वेतनात कपात करण्यात येईल. जे अमलदार क्षयरोग, कर्करोग, पक्षघात या रुग्ण निवेदनात असतील त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा वैद्यकीय अधीक्षक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपचाराचा कालावधी जोडून वेळोवेळी सादर करणे आवश्यक आहे अन्यथा मासिक वेतन आकारणी करण्यात येणार नाही, असे पोलिस आयुक्त यांनी आदेशात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.