अद्याप तरी मुंबईकर सुरक्षित! ५० हजार कोरोना चाचण्या, रुग्ण मात्र अडीचशे! 

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के एवढा झाला आहे. संपूर्ण मुंबईत झोपडपटी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंट झोनची संख्या शून्य असून इमारतींची संख्या २४ एवढी आहे.

130

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बाधित कोविड रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्या आणि संपर्कातील लोकांचा शोध घेताना १५ ऐवजी २० माणसे एवढे प्रमाण गृहीत धरण्याचे निर्देश दिल्यानंतर चाचण्यांचे प्रमाण आता वाढवण्यात आले आहे. मागील दोन दिवसांमध्ये पन्नास हजार पार कोविड चाचण्यांची संख्या करण्यात आल्यानंतरही रुग्णांचा आकडा दोनशे ते तीनशेच्या आतच सीमित राहिलेला पाहायला मिळत आहे. कोविड चाचण्या वाढल्यानंतरही रुग्ण संख्या वाढलेली नसल्याने मुंबईकर अजून तरी सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के!

मुंबईत शनिवारी, २१ ऑगस्ट २०२१ रोजी एकूण बाधित नवीन रुग्ण २५९ आढळून आले आहेत. दिवसभरात ३४ हजार ८८३ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर २५९ रुग्ण आढळून आले. मात्र शनिवारपर्यंत संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणी २ हजार ८२५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर हा २०२३ दिवसांवर आला असून मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के एवढा झाला आहे. संपूर्ण मुंबईत झोपडपटी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंट झोनची संख्या शून्य असून इमारतींची संख्या २४ एवढी आहे.

(हेही वाचा : उद्यान, मैदानांच्या कंत्राटदारांचे ऑडिट करूनच बिले द्या! भाजपचा महापालिकाकडे मागणी)

चाचण्या वाढल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढली नाही!

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर आता रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोविड चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील १५ ऐवजी २० लोकांचा शोध घेण्यासही सुरुवात झाली. आजवर सरासरी २६ ते ३० हजार एवढ्या कोविड चाचण्या करण्यात येत असताना १८ ऑगस्ट रोजी ३८ हजार ७०३ एवढ्या चाचण्या केल्या. त्यात २८३ रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ व २० ऑगस्ट रोजी अनुक्रमे ५२ हजार ४५२ व ५६ हजार ५६६ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे २८३ व ३२२ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे चाचण्या वाढल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढलेली नसल्याने एकप्रकारे मुंबईकरांसाठी हे सुचिन्ह असल्याचे बोलले जात आहे.

मागील पाच दिवसांमधील रुग्णसंख्या व चाचण्यांची संख्या

१७ ऑगस्ट २०२१ : रुग्ण संख्या – १९८, चाचण्या – २८,५०८

१८ ऑगस्ट २०२१: रुग्ण संख्या – २८३, चाचण्या – ३८,७०३

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.