ठाकरे सरकार अशी लावणार तिस-या लाटेची वाट

138

कोरोना व्हायरसविरोधी लढाईत लसीकरण मोहमेला वेग देण्यात येत आहे. तसंच सध्या कोरोनाची रुग्णसंख्याही कमी होत आहे. पण आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. नीती आयोगानेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारला सावध करत इशारा दिला आहे. याचमुळे आता ठाकरे सरकार देखील सतर्क झाले असून, आरोग्य विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाने संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता साडे पाचशे कोटींची तरतूद फक्त कोविडसाठी लागणाऱ्या औषध आणि इतर साहित्यांवर केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे.

असा करणार मुकाबला

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग ५५० कोटी रुपयांची औषधे खरेदी करणार आहे.

  • रेमडेसिवीर इंजेक्शन्स- २ लाख ५० हजार
  • टॉसिलिझुमाब इंजेक्शन्स- १० हजार
  • पॅरॅसिटॉमल गोळ्या- १ कोटी ५० लाख
  • ऑक्सिजन मास्क- ५० हजार
  • आरटीपीसीआर टेस्ट किट- ३ कोटी
  • रॅपिड अँटिजन टेस्ट किट- ८७ लाख ५० हजार
  • ट्रिपल लेअर मास्क- १ कोटी ५० लाख
  • N95 मास्क- १ कोटी ३२ लाख ५० हजार
  • पीपीई किट- १ कोटी ३२ लाख ५० हजार
  • डेड बॉडी सूट – १ लाख २५ हजार

(हेही वाचाः अद्याप तरी मुंबईकर सुरक्षित! ५० हजार कोरोना चाचण्या, रुग्ण मात्र अडीचशे! )

नीती आयोग म्हणाले तिसरी लाट गंभीर

पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रोज कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत आढळून येऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला किमान २ लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, असं नीती आयोगाने सरकारला म्हटले आहे. नीती आयोगाने गेल्या वर्षी सप्टेंबरपूर्वी २०२० मध्ये दुसऱ्या लाटेआधी अंदाज व्यक्त केला होता. दुसऱ्या लाटेत गंभीर आणि मध्यम लक्षणं असणाऱ्या २० टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं, असं त्या अंदाजात म्हटलं होतं. आता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत नीती आयोगाने तिसऱ्या लाटेचा व्यक्त केलेला अंदाज हा आपल्याला सतर्क करणारा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.