अमेरिकन सैन्य माघारी जाताच तालिबान्यांनी लागलीच अफगाणिस्तान काबीज केले असून त्याचा झेंडाही बदलला आहे. सफेद रंगाच्या या झेंड्यावर ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मादुर रसूलुल्लाह’ अर्थात ‘महंमद पैगंबर यांच्या व्यतिरिक्त कोणताही देव नाही’ असे म्हटले आहे. रविवारी, २२ ऑगस्ट रोजी या नव्या झेंड्याची अधिकृत घोषणा तालिबान्यांनी केली. तसेच अफगाणिस्तान विविध शहरांमध्ये हा झेंडा फडकावण्यास सुरुवातही केली. या दरम्यान काही अफगाण नागरिकांनी त्यांचा जुना झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तालिबान्यांनी गोळीबार केला, त्यात ३ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळालेल्या अफगाणिस्तानचा मागील १०० वर्षांत अशा रीतीने १-२ वेळा नव्हे तर तब्बल १८ वेळा झेंडा बदलला आहे, यावरून ही भूमी कायम संघर्षात राहिलेली आहे, याचा प्रत्यय येतो.
१९०१ – १९१९
ब्रिटिश राजवटीपासून सुटका झाल्यावर हबिबुल्ला याने त्याच्या वडिलांच्या काळ्या रंगाच्या झेंड्यात बदल केला. ज्यामध्ये मशिदीचे चित्र, त्यावर पुष्पहार आणि त्याच्या खाली दोन तलवारी क्रॉस असल्याचेही चित्र होते.
१९२१
पुन्हा या झेंड्यात बदल करण्यात आला. त्यामधील मशिदीचे चित्र आणि त्यावरील पुष्पहार झेंड्याच्या मधोमध घेतले आणि तलवारी लहान केल्या.
१९२६
राजा अमानुल्ला याने १९२६ मध्ये अफगाणिस्तानच्या झेंड्यातील पुष्पहार काढून त्या जागी चांदणीचे चित्र टाकले. तलवारी काढून टाकल्या आणि मशिदीचे चित्र ठळक केले.
(हेही वाचा : आता तालिबान्यांचे ‘हे’ आहे पुढील लक्ष्य! पुन्हा सुरु झाली युद्धाची तयारी!)
१९२९
अफगाणिस्तान हबिबुल्ला कलकानीच्या ताब्यात गेले, त्याने झेंड्यात बदल करून तो तीन रंगांचा केला.
१९२९
हबिबुल्ला कलकानीचा चुलत भाऊ महंमद नादीर शहा याने यशस्वी बंड केले आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतले. त्याने झेंड्यात बदल करताना तीन रंगात बदल केले, त्यामध्ये भूतकाळाच्या स्मरणासाठी काळा, स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल आणि समृद्धीचे प्रतिक म्हणून हिरवा रंग घेतला मात्र झेंड्याच्या मधोमध स्वतःची ओळख दर्शवणारे वेगळे चिन्ह टाकले.
१९३३
महंमद नादीर शहा याची हत्या होते, त्यानंतर त्याचा मुलगा महंमद झहीर हा राजा बनतो, तो मशिदीचे चित्र मध्ये घेतो आणि भोवती गव्हाचे कणसे दाखवतो. मात्र त्यावर वडील नादीर यांच्या स्मरणार्थ चिन्ह ठेवतो.
१९७३
झहीरचा चुलत भाऊ महंमद दाऊद खान यशस्वी बंड करून अफगाणिस्तानची राजवट ताब्यात घेतो. तो झेंड्यावरून नादीर याच्या स्मरणार्थ ठेवलेले चिन्ह काढतो.
१९७४
झेंड्यात पुन्हा बदल होतो, तीन रंगांपैकी हिरवा रंग जास्त जागा घेतो आणि झेंड्याच्या वरती पंख विस्तारलेल्या घारीचे चित्र घातले जाते.
१९७८
कम्युनिस्ट गटाने दाऊदची हत्या केल्यानंतर नूर महंमद तारकी हा राष्ट्राध्यक्ष बनला. त्यानंतर पाहिलांदा झेंड्यावरील स्मृतिचिन्ह हटवण्यात आले आणि संपूर्ण झेंडा लाल रंगाचा करण्यात आला. झेंड्याच्या एक बाजूला ‘खलक’ (जनता) हा शब्द लिहिण्यात आला आणि भोवती गव्हाची कणसे दाखवण्यात आली.
१९७९-१९८०
सप्टेंबर १९७९ मध्ये तारिकी याची हत्या झाली. हाफीझुल्ला अमीन हा नवीन राष्ट्राध्यक्ष बनला. तो कम्युनिस्ट गटाचा समर्थक होता. पुढे बाब्राक कर्माल हा राष्ट्रध्यक्ष बनला, त्याने १९८०मध्ये झेंडा बदलला. सूर्य उगवत आहे, भवती हिरवे शेत आहे आणि समोर पुस्तक उघडलेले आहे, अशा स्वरूपाचे चिन्ह झेंड्यावर आले. त्यात लाल रंगाचा कम्युनिस्टांचा तारा आणि गव्हाची कणसे हेदेखील त्यात दाखवण्यात आली.
१९८६
बाब्राक कर्माल याला सत्तेवरून खाली उतरवल्यावर महंमद नजीबुल्ला हा सोव्हिएत युनियनचा म्होहरा सत्तेवर आला. सैन्यात सोव्हिएतविरोधात ९० हजार मुजाहिद्दीन निर्माण होतात. झेंड्यावरील चिन्हे बदलले. कम्युनिस्टांचे चिन्ह असलेला लाला तारा आणि पुस्तक काढण्यात आले.
(हेही वाचा : तालिबानी दहशत : ट्विटरवर सुरु झालेल्या ‘इस्लामोफोबिया’ ट्रेंडवर नेटकऱ्यांचा प्रतिहल्ला)
एप्रिल १९९२
तीन वर्षांनंतर सोव्हिएत निघून जातात. अहमद मसूद मुजाहिद्दीन कबूल ताब्यात घेतो. जूनमध्ये बृहानुद्दीन रब्बानी हा इस्लामिक स्टेटचा अध्यक्ष बनला. डिसेंबरला झेंडा बदलला. झेंड्यावरून लाल रंग हद्दपार झाला. हिरवा रंग, सफेद आणि काळा हे तीन रंग आले. मधोमध पुन्हा मशीद. भोवती गव्हाची कणसे आणि या सर्व भोवती दोन तलवारी क्रॉसमध्ये दाखवण्यात आल्या.
१९९४
रब्बानी विषयी नाराजी वाढू लागली. जानेवारीत सरकार कमकुवत झाले. ऑक्टोबरमध्ये तालिबान्यांनी देशात शांतता प्रस्थापित करू असे आश्वासन दिले. त्यांना काबूल ताब्यात घ्यायचे होते.
१९९६
तालिबान्यांनी कबूल ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तान हे इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले. सगळा झेंडा सफेद रंगाचा केला. त्यामध्ये कुराणातील आयते लिहिली.
१९९७
अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पुन्हा अफगाणिस्तानात आला आणि तालिबान्यांचा म्होरक्या मुल्ला ओमर याचा विश्वासू बनला.
सप्टेंबर २००१
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या दोन टोलेजंग इमारती प्रवासी विमाने घुसवून पाडण्यात आली. अमेरिकेला ओसामा बिन लादेनवर शंका आली. त्यांनी तालिबान्यांकडे लादेनच्या मागणी केली. त्याला नकार दिल्यावर अमेरिकेने ब्रिटनच्या मदतीने अफगाणिस्तानवर ऑक्टोबरपासूनच बॉम्बहल्ला सुरु केला.
नोव्हेंबर २००१
तालिबानविरोधी गट जो रब्बानी सरकारचा घटक होता, त्यांनी तालिबान्यांकडून काबूल ताब्यात घेतले. पुन्हा रब्बानी सरकारच्या काळातील झेंडा आला, हिरवा रंग, सफेद आणि काळा हे तीन रंग आले. मधोमध पुन्हा मशीद. भोवती गव्हाची कणसे आणि या सर्व भोवती दोन तलवारी क्रॉसमध्ये दाखवण्यात आल्या.
२००२
हमीद करझई हा अमेरिकेच्या पाठिंब्याने सत्तेवर आल्यावर त्याने झेंड्यात बदल केला. झेंड्याचा रंग हिरवा, लाल आणि काळा केला. मधल्या मशीद. भोवती गव्हाची कणसे आणि या सर्व भोवती दोन तलवारी क्रॉसमध्ये दाखवण्यात आलेल्या चिन्हातील तलवारी हटवला आणि चिन्ह सोनेरी न ठेवता सफेद रंगाचे ठेवले.
(हेही वाचा : ठाकरे सरकार अशी लावणार तिस-या लाटेची वाट)
ऑक्टोबर २००४
वादावादीनंतर करझई हा राष्ट्राध्यक्ष बनला. अफगाणिस्तान मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित झाले.
ऑगस्ट २०१३
करझई याची सत्ता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली. झेंड्यावरील चिन्ह मोठे करण्यात आले.
सप्टेंबर २०१४
अशरफ घनी राष्ट्राध्यक्ष बनले. दोन वेळा सत्तासोपान प्राप्त झाले. सप्टेंबर २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आले.
फेब्रुवारी २०२०
अफगाणिस्तानातील १८ वर्षे युद्धजन्य परिस्थितीनंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांती करार झाला.
ऑगस्ट २०२१
करार झाल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु करताच तालिबान्यांनी हिंसाचार माजवून काबूल ताब्यात घेतले आणि २२ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबान्यांनीं पुन्हा त्यांचा सफेद रंगाचा झेंडा अफगाणिस्तानात फडकावला.
Join Our WhatsApp Community