आमचेही त्यांच्या’वर’ सरकार आहे! नारायण राणेंचा गर्भीत इशारा

माझे वक्तव्य तपासून घ्यावे, पोलिसांची तत्परता 'आदेशा'मुळे आहे. आमचेही सरकार त्यांच्यावर आहे. आम्ही पाहून घेऊ. आमची यात्रा नियोजनानुसार होईल, असे केंद्रीय नारायण राणे म्हणाले.

122

मी कुठलाही गुन्हा केला नाही, माझ्याकडे माहिती नाही, त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. माझ्यावर कारवाई करा, हे कोण बोलते आहे, बडगुजर यांना मी ओळखत नाही. मी बातम्यांवर बोलणार नाही, दोन दगड मारले म्हणून हा पुरुषार्थ नाही. तुम्ही कार्यालयावर दगडफेक केली तर उद्या तुमच्या घरावर दगड पडतील, हे लक्षात घ्यावे, असा इशारा राणेंनी दिला. ज्या वेळी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन, असे म्हटले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना थोबाड फोडा, असे म्हणाले होते, हा गुन्हा नाही का, असे केंद्रीय नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. म्हणून कायद्यानुसार राणे यांना अटक करता येऊ शकत नाही. कारण कायद्यात राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या खाली केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री येतात, त्यांना अटक करता येऊ शकत नाही. सरकारचे कोण कायदेशीर सल्लागार आहेत माहित नाही, हे सरकार पुन्हा न्यायालयात तोंडावर आपटणार आहे.
– चंद्रकांत पाटील, भाजप, प्रदेशाध्यक्ष

मी कुठलाही गुन्हा केला नाही!

मी कुठलाही गुन्हा केला नाही. ‘१५ ऑगस्ट’ हा स्वातंत्र्य दिन हा मुख्यमंत्र्यांना माहित नाही. मी त्यावर बोलताना म्हणालो होतो कि, ‘मी तेथे असतो तर…’ असे म्हटलो आहे. ‘मी आता कानशिलात मारेन…’ असे म्हटले असते तर गुन्हा ठरला असता. मी माध्यमांचा आदर करतो म्हणून उत्तर देतो, म्हणून तुम्हीं काहीही बातम्या दाखवू नका, अन्यथा मी तुमच्याविरोधात गुन्हा दाखल कारेन, असेही राणे माध्यमांना म्हणाले.

(हेही वाचा : केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना अटक होऊ शकते का? काय म्हणतो कायदा?)

शिवसैनिकांना भीक घालत नाही!

मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. आदेश कुठलाही काढू द्या, तो राष्ट्रपती आहे का कि पंतप्रधान आहे ? माझे वक्तव्य तपासून घ्यावे, पोलिसांची तत्परता ‘आदेशा’मुळे आहे. आमचेही सरकार त्यांच्यावर आहे. आम्ही पाहून घेऊ. आमची यात्रा नियोजनानुसार होईल, असे केंद्रीय नारायण राणे म्हणाले. आमची दुप्पट आक्रमकता आहे. नारायण राणे निघाले आणि तिथेच शिवसेना संपली. मी स्वतः प्रॅक्टिकल वकील आहे. गुन्हा कुठे घडतो हे मला माहित आहे. सर्वांसाठी कायदा आहे, असेही राणे म्हणाले.

तर भाजप जेलभरो आंदोलन करणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेकरिता आज चिपळूण व रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अटकेची बातमी समोर झाल्यावर यात्राप्रमुख प्रमोद जठार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी दसरा मेळावा असो किंवा राष्ट्रवादीचे गृहमंत्री असो यांनी केलेली भाषा चालते. सरकारने ठाकरी भाषेत उत्तर द्यावे. राणेसाहेब यांनी काही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. त्यांना अटक करण्यासाठी पथक आले तर आम्ही कोकणचे सर्व भाजप कार्यकर्ते अटक करून घेऊ, असे प्रमोद जठार म्हणाले. दरम्यान यात्रा नियोजन ठरल्याप्रमाणे होणार आहे, त्यामुळे सर्व कार्यक्रम होणार आहेत, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.