वरून देसाई आम्ही नसताना आमच्या घराकडे जातात, इतर वेळी भेटून विनंत्या करत असतात. आम्ही असताना त्यांनी यावी, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असलेले वरून देसाई पोलिसांना आई-वाहिनीवरून शिव्या देतात, शिवसैनिक दगडे मारतात आणि माध्यमांशी बोलताना ‘उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे’, असे म्हणतात हा काय प्रकार आहे? हा सर्व प्रकार चालतो का?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र, भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
(हेही वाचा : राणेंच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांचा राडा! पोलिसांनी केला लाठीचार्ज)
मुख्यमंत्र्यांवर कारवाई होण्याची गरज
१५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले देशाचा अवमान केला. खरे तर याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे पण याउलट त्यावर आक्षेप घेणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. हे सरकार हिंदू विरोधी आहे हे माहीत होते, पण आता हे सरकार राष्ट्रद्रोहीदेखील आहेत, असेही नितेश राणे म्हणाले. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. या प्रकरणी पक्ष जी भूमिका घेतो, ती आम्ही मान्य करतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांनी हा कायदा दखलपात्र नव्हता पण तरीही तो दखलपात्र बनवण्यात आला, असेही राणे म्हणाले. सध्या जन आशीर्वाद यात्रा ही सुरळीत सुरु आहे. त्यात कोणताही अडथळा येणार नाही, पुढचे आम्ही पाहू, असेही राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community