निधी चौधरींची पुन्हा बदली : उपनगराच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची बदली एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे.

117

मागील काही दिवसांपासून सनदी अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरु असून रायगडच्या जिल्हाधिकारी असलेल्या निधी चौधरी यांची बदली माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. निधी चौधरी यांची बदली आता मुंबई उपनगरे जिल्हाधिकारीपदी करण्यात आली असून उपनगराचे विद्यमान जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची बदली टुरिझम विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे.

जयश्री भोज यांची बदली एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी 

मागील आठवड्यात राज्यातील सनदी अधिकाऱ्यांची बदली करून माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. परंतु अवघ्या चारच दिवसांमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदाच्या ऐवजी निधी चौधरी यांची बदली मुंबई उपनगरे जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. तर उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची बदली टुरिझमच्या संचालकपदी करण्यात आली आहे. याबरोबरच माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची बदली एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. तर डॉ. निरुपमा डांगे यांची बदली महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्तपदी करण्यात आली आहे.

(हेही वाचा : शिवसेना राणेंच्या विरोधात रस्त्यावर, भाजपने उरकले गिरगाव चौपाटीवरील प्रसाधनगृहाचे लोकार्पण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.