मंगळवारी युवा सेनेने घातलेल्या राड्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “कोरोना हृदय सम्राट”गप्प का? असा सवाल विचारला होता, त्याची चर्चाही झाली होती. मात्र बुधवारी पुन्हा एक हटके ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. ज्यात त्यांनी मंगळवारी शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे राज्याला झालेल्या फायद्यांची यादी दिली आहे. मंगळवारी झालेल्या राड्यात कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे दिसले. त्याच मुद्यावरुन संदीप देशपांडेंनी सत्ताधारी शिवसेने विरोधात हे उपहासात्मक ट्वीट केले आहे.
ही आहे यादी
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी खोचक ट्वीट करत, मंगळवारी शिवसैनिकांनी केलेल्या राड्यामुळे महाराष्ट्राला कोणते फायदे झाले, याची यादी दिली आहे.
मंगळवारच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला झालेले फायदे-
- डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं.
- घरचंच आंदोलन होत त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये, म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी.
- सोशल डिस्टनसिंगचा फज्जा पत्रकार विसरले.
- आता आपण कोरोनाच्या कानात आत्मविश्वासाने सांगू शकतो, “तू संपलास”,
असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
(हेही वाचाः राडा संपता संपेना… भाजप आमदाराला धमकीचा फोन)
कालच्या भानगडी मुळे महाराष्ट्राला झालेले फायदे1)डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं2)घरचंच आंदोलन होत त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी3)सोशल डिस्टनसिंग चा फज्जा पत्रकार विसरले4)आता आपण करोनाच्या "कानात"आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 25, 2021
“कोरोना हृदय सम्राट”गप्प का?”
मंगळवारी सकाळी युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचाही संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला होता. सकाळपासून महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दीच गर्दी असे असून, “कोरोना हृदय सम्राट”गप्प का?” आणि हो सोशल डिस्टनसिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरुन, हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत, असे ट्वीट त्यांनी मंगळवारी केले होते.
(हेही वाचाः दोन दिवसांत झाली शिवसेनेला राणेंची ओळख)
Join Our WhatsApp Communityआज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था "फाट्यावर"मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून "करोना हृदय सम्राट"गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 24, 2021