१६ हजार वीरांगनांच्या बलिदानाला ७१८ वर्षे पूर्ण! राणी पद्मिनीच्या पराक्रमाचे व्हावे स्मरण! 

राणी पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303 मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला. राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते.

174

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तालिबान्यांनी फतवा काढला आहे. १४ वर्षांवरील मुली आणि ४० वर्षांपर्यंतच्या विधवा आमच्या ताब्यात द्या, असे तालिबान्यांनी अफगाण नागरिकांना म्हटले आहे. त्यामुळे धर्मांध मुसलमान अय्याशी करण्यातच पुरुषार्थ मानतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्या खिलजीने केवळ राणी पद्मिनीला उपभोगता यावे आणि त्यानंतर १६ हजार महिलांचा उपभोग घेता यावा यासाठी युद्ध केले, हा ‘वारसा’ तालिबानी मुसलमानांच्या माध्यमातून पुढे आला आहे, याचे हे प्रमाण आहे.

अल्लाउद्दीन खिलजी हा  दिल्लीच्या गादीवर होता, त्यावेळी मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता. चित्तोडगड ही त्याची राजधानी होती. तसेच रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती. लहानपणापासून युद्धकौशल्यात निपुण असणारी राणी पद्मिनीने तिच्या स्वयंवरासाठी पण केला होता. जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल. तो सैनिक मात्र स्वतः पद्मिनीच असे. असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले. रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रूपासाठी त्याकाळी जगविख्यात होते. अशा चित्तोडवर खिलजीने कपटाने आक्रमण करून राणा रतनसिंह याला हरवले, तेव्हा खिलजीच्या जनानखान्यात जाण्यापेक्षा शुद्ध अग्नीला समर्पित होण्याचा निर्णय राणी पद्मिनी आणि गडावरील १६ हजार स्त्रियांनी जोहर केला, अग्निमध्ये स्वतःला संपवले, हे पाहून खिलजीला जिंकूनही हरल्याचा अनुभव आला, २६ ऑगस्ट रोजी या घटनेला ७१८ वर्षे पूर्ण होत आहेत.

फितुरीचा राणा रतनसिंहाला बसला फटका!

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राण्याने राघव चेतनला अपमानित करून दरबारातून हाकलून दिले. सूडाग्नीने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका वनात जाऊन बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे. एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरू केले. बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दीनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करून सांगितले की, “तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे”, हे ऐकून खिलजीच्या व्यभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली.

(हेही वाचा : आता भाजप फ्रंटफूटवर : रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल!)

खिलजीकडून कपट 

पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303 मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला. राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते. तेव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की, “मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले, तर मी दिल्लीला निघून जाईन.” प्रजाहितास्तव राण्याने हे मान्य केले. परंतु यामागील कुटिल डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे,असे सुचविले.त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला. ‘अतिथी देवो भव’ या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला. मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करून खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,”राणा जिवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा.”

स्त्री लंपट खिलजीवरच उलटला डाव! 

गडावर सैनिकी खलबते झडली. आणि गडावरून निरोप गेला की,”राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दीनच्या डेऱ्यात दाखल होईल, पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे.” ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेऱ्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली. राणा रतनसिंहाला मोकळे करून घोड्यावर बसवण्यात आले. पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला. आणि….आणि हे काय? क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या. राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेऊन आणि त्याचा पुतण्या बादल (ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे). काही निवडक सैनिकांना घेऊन स्त्रीवेश धारण करून खिलजीच्या डेऱ्यात घुसले होते. काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरू झाली.गोरा तर खुद्द अल्लाउद्दीनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले. स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले. आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राण्याला घेऊन झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.

(हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मुंबईत असा दिला धक्का)

… आणि खिलजी खजील झाला!

आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला. काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले. २६ ऑगस्ट १३०३ रोजी गडाचे दरवाजे उघडून, ‘जय एकलिंग,जय महाकाल’ चे नारे देऊन राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली. परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला. दहा-दहा सुलतानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत मृत्युमुखी पडला..लढाई संपली. राण्यासहित सर्व राजपूत मारले गेले. अन् वखवखलेले सुलतानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार, म्हणून गडात घुसले. पण गडावर शिरताच पाहतात तर काय, एकही स्त्री दिसेल तर शपथ.थोडे पुढे जाऊन चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध ‘विजयस्तंभ’ ओलांडल्यावर लागणाऱ्या विस्तीर्ण मैदानावर, जिथे आज ‘जौहर स्थल’ म्हणून पाटी लागलेली आहे, तिथे राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते, त्याच अग्नीत उड्या घेतल्या. स्वतःच्या शीलाचे व देव, देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका आगीत जळून भस्म झाल्या..तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवले, पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला. लढाई संपल्यावर सुमारे ३०,००० निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दीनने कत्तल केली, असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.