मुंबईत नवीन कोविड रुग्णांचा पारा वाढतोय!

बुधवारी दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर गुरुवारी रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ७ एवढा होता.

120

कोविडची तिसरी लाट येईल का? कधी येईल याची विचारणा होत असतानाच मुंबईत आता कोविड रुग्णांचा पार वाढू लागला आहे. मुंबईत गुरुवारी एकूण ३९७ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात एकूण ४१ हजार ६२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुन्हा चारशेच्या आसपासच्या रुग्णसंख्येचा आकडा पोहोचला आहे. तर दिवसभरात ५०६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

मृत्यूचा आकडा ७ एवढा होता!

मुंबईमध्ये बुधवारी ४२ हजार ७२३ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३४३ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर गुरुवारी केलेल्या ४१ हजार ६२८ कोविड चाचण्यांमध्ये ३९७ नवीन रुग्ण आहेत. बुधवारी दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर गुरुवारी रुग्णाच्या मृत्यूचा आकडा ७ एवढा होता. यामध्ये ६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ३ रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिलांचा समावेश होता. यातील एका रुग्णाचे वय हे चाळीशीच्या खालील होते. तर ४ रुग्णांचे वय साठी पार आहे, तर उर्वरीत २ रुग्णांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहे. मुंबईत गुरुवारपर्यंत विविध ठिकाणी २ हजार ७३६ रुग्णांवर उपचार सुरु होता. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आणि रुग्ण दुपटीचा दर हा १,८२५ दिवसांचा आहे. झोपडपटी व चाळींमधील सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्यावर असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ही २४ एवढी आहे.

(हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या रस्त्यांवरील झाकणांची चोरी)

मागील दहा दिवसांमधील रुग्णसंख्या व चाचण्यांची संख्या

  • १७ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – १९८, चाचण्या – २,८५०८
  • १८ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – २८३, चाचण्या – ३,८७०३
  • १९ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – २८३, चाचण्या – ५२,४८२
  • २० ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – ३२२, चाचण्या – ५६,५६६
  • २१ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – २५९, चाचण्या – ३४,८८३
  • २२ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – २९४, चाचण्या – ३२,६१६
  • २३ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – २२६, चाचण्या – २४,८२८
  • २४ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – २७०, चाचण्या – २८,७४०
  • २५ ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – ३४३, चाचण्या – ४२,७२३
  • २६ऑगस्ट २०२१:  रुग्ण संख्या – ३९७, चाचण्या – ४१६२८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.