अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाच्या बाहेर तालिबान्यांनी ३ शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून किमान १०० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात ६० अफगाण नागरिक असून १३ जण अमेरिकेतील जवान आहेत. त्यामुळे आता काबूल विमानतळाच्या बाहेरील वातावरण तणावाचे बनले आहे. त्यातच अमेरिका ३१ ऑगस्टपासून सैन्य मागे घेणार आहे, त्यानंतर मात्र या ठिकाणी काय परिस्थिती होईल, ही आता चिंतेची बाब बनली आहे, कारण सध्या काबूल विमानतळात आणि बाहेर किमान सव्वा लाख अफगाण नागरिक अडकलेले आहेत.
३१ ऑगस्टनंतर रक्तपात!
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून शरणार्थी अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरु केली, तेव्हापासून ११ दिवसांत अमेरिकेने आतापर्यंत ८८ हजार नागरिकांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. त्यासाठी सध्या दर ३९ मिनिटांत एक विमान सोडले जात आहे. मात्र असे असले तरी सध्या काबूल विमानतळात आणि विमानतळाबाहेर एकूण सव्वा लाख नागरिक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या सर्वांना पुढच्या ५ दिवसांत अफगाणिस्तानातून बाहेर काढणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टनंतर जेव्हा अमेरिका त्यांचे सैन्य माघारी घेऊन जाईल, तेव्हा या ठिकाणी किती रक्तपात होईल, अशी चिंता आता जागाला लागली आहे.
Indian Govt statement on the #KabulAiport terror attack. pic.twitter.com/NuVTgG9V4Z
— Shiv Aroor (@ShivAroor) August 26, 2021
तालिबान्यांची धमकी!
दरम्यान तालिबान्यांनी अफगाण नागरिकांना देश सोडून जाऊ नका, अशी धमकी द्यायला सुरु केली आहे. विचारवंत, उच्च शिक्षित, डॉक्टर यांनी देश सोडून जाऊ नये, महिलांनी घरातच राहावे, अशी धमकी द्यायला सुरु केली आहे. मात्र तरीही अफगाण नागरिक हे तालिबान्यांच्या २ दशकांपूर्वीच्या राजवटीचा अनुभव पाहून ते देश सोडून निघून जात आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ल्याची आम्ही आधीच कल्पना दिली होती, असे तालिबान्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचा इशारा!
काबूल विमानतळाकडील बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबानला इशारा दिला आहे. दहशतवादाशी कसे लढायचे याचा अमेरिकेला चांगलाच अनुभव आहे. या दहशतवाद्यांना आम्ही माफ करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. या हल्ल्यातील हल्लेखोरांना अमेरिका शोधून शोधून ठार करेल, असा इशारा बायडेन यांनी दिला आहे. तर या हल्ल्याचा भारतानेही निषेध केला आहे.
Join Our WhatsApp Community