रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यात राहणाऱ्या लहान मुलाचा खेळ म्हणजे धावत्या ट्रेनवर दगडी मारणे, रुळावर दगडी, लोखंड, नाणी ठेवणे अशा प्रकाराचे खेळ खेळणाऱ्या मुलांना हे कुठे माहीत की, आपण प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहोत. डोंबिवली असाच प्रकार समोर आला आणि मोटरमनने दाखवलेल्या तत्परतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
मोटरमनच्या प्रसंगावधानने प्रसंग टाळला!
रेल्वे स्थानक परिसरात राहणारे फेरीवाले, भिकारी यांची मुले रेल्वे स्थानक आणि रुळालगत खेळत असताना एका १५ वर्षांच्या मुलाने रेल्वे रुळावर एक नाही दोन नाही तर चक्क दहा ते बारा दगड एका रांगेत रुळावर ठेवले होते. मात्र वेळीच मोटरमनच्या हे लक्षात आल्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान दाखवत ट्रेनचे इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे डोंबिवली आणि ठाकुर्लीच्या दरम्यान रेल्वेची मोठी दुर्घटना होता होता टळली. २६ ऑगस्टची ही घटना आहे. मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली स्थानकाजवळील फलाट क्रमांक १ वर आलेली कर्जतकडे जाणारी धीमी ट्रेन रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना काही अंतरावर रेल्वे रुळावर रांगेत दहा ते बारा दगडी ठेवलेली मोटरमनला दिसली. रुळावर दगडी बघून मोटरमनने ताबडतोब इमर्जन्सी ब्रेक लावले आणि ट्रेन स्लो करून या रांगेतील दगडापासून काही अंतराच्या आत ट्रेन थांबली. मोटरमनने स्टेशन मॅनेजरला याबाबत कळवताच रेल्वे कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी (रेल्वे पोलीस) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रुळावरील दगडी बाजूला करून ट्रेनला वाट करून दिली.
(हेही वाचा : घाबरू नका! पोलिस आता तुमच्याकडून ‘शपथपत्र’ घेणार नाही!)
गंमत म्हणून दगडी ठेवलेली
घटनेची गंभीरता बघून या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला करून शुक्रवारी डोंबिवली स्थानकावर राहणाऱ्या एका भिकाऱ्याच्या १५ वर्षांच्या मुलाला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत गंमत म्हणून दगडी ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली. याप्रकरणी या मुलाला अटक करून त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली असल्याचे ढगे यांनी सांगितले. हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आला नसता अथवा ट्रेनची गती वाढली असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे देखील ढगे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community