सूक्ष्म आणि लघूमध्ये काय निधी मिळणार, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता त्या टीकेला नारायण राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. अजित पवार अजून अज्ञात आहेत, त्यांनी आपलं खातं सांभाळावं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, असा इशारा देखील यावेळी राणेंनी दिला. कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा रविवारी शेवटचा दिवस असून, राणेंनी यावेळी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधानांनी दिला निधी
माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो, पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. माझ्याकडे असणाऱ्या योजनांना एकाच वेळी साडे चार लक्ष निधी दिला होता. त्यातील तीन लक्ष कोटी खर्च झाला, अजून १ कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत.
(हेही वाचाः सेनेच्या वैयक्तिक टीकेवर आता होणार ‘प्रहार’)
काय म्हणाले होते अजित दादा?
राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सूक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार? केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच निधी दिला आहे. राज्यात अनेक कामेही प्रगतीपथावर आहेत, असेही अजित पवार म्हणाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यात कुणाला किती फायदा झाला की झालाच नाही, हा संशोधनाचा विषय आहे, असे सांगत पवार यांनी निशाणा साधला होता.
(हेही वाचाः राणेंची यात्रा म्हणजे येड्यांची जत्रा… राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका)
Join Our WhatsApp Community