तालिबानी पद्धतीने भाजपाने शेतकऱ्यांच्या रक्ताने भूमी भिजवली! शिवसेनेचा हल्लाबोल     

ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करणाऱया  शेतकऱयांचे नेते लाला लजपतराय रस्त्यावर उतरले तेव्हा ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना असेच डोकी फुटेपर्यंत मारले. त्यातच लालाजींचा अंत झाला. हरयाणातही तेच घडले, असेही शिवसेनेने म्हटले आहे. 

104

हा लाठीहल्ला साधा नाही. अंदाधुंद गेळीबारापेक्षा भयंकर आहे. अफगाणिस्तानात तालिबानी ज्या पद्धतीचा हिंसाचार घडवून माणसे मारीत आहेत, त्याच तालिबानी पद्धतीने हरयाणाच्या भाजप सरकारने शेकडो शेतकऱयांची डोकी फोडून भारतमातेची भूमी रक्ताने भिजवली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हा रक्तपात झाला. ‘‘शेतकऱ्यांना डोकी फुटेपर्यंत मारा, शेतकरी आंदोलनासाठी उतरल्यावर डोक्यावर नेम धरून काठय़ा-लाठय़ा चालवा. डोकी फुटायलाच हवीत’’ असा आदेश उपजिल्हाधिकारी आयुश सिन्हा हे पोलिसांना देत असल्याचा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा सरकारी आदेश असतो. सरकारने शेतकऱयांना खतमच केले. ‘‘शेतकऱयांची डोकी फोडणारे हरयाणा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा’’ अशी मागणी आता कोणी करणार आहे काय? मोदी सरकारातील एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देतो. त्याबद्दल त्याच्यावर ‘सूक्ष्म’ कायदेशीर कारवाई होताच ‘‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा हो।़।़’’ अशा बोंबा ठोकणारे हेच लोक हरयाणातील रक्तबंबाळ शेतकऱ्यांचे चित्र पाहून गप्प आहेत, असा हल्लाबोल शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनाच्या संपादकीय लेखामधून करण्यात आला.

सरकारी आदेशाने हरयाणात शेतकऱ्यांचा खून करण्याचा प्रयत्न! 

ब्रिटिश राजवटीत शेतकऱयांच्या विरोधात कायदे करणाऱया  शेतकऱ्यांचे नेते लाला लजपतराय रस्त्यावर उतरले तेव्हा ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना असेच डोकी फुटेपर्यंत मारले. त्यातच लालाजींचा अंत झाला. हरयाणातही तेच घडले. भाजपच्या राज्यस्तरीय बैठका सुरू असताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधातफक्त घोषणा दिल्या म्हणून पोलिसांनी सरकारी आदेशाने शेतकऱयांचा खून करण्याचा प्रयत्न केला. एका मंत्र्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली म्हणून राज्य सरकार असहिष्णू कसे यावर बोलले गेले. मात्र आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱयांनी फक्त घोषणा दिल्या म्हणून पोलिसांनी बेकायदेशीरपणे त्या निरपराध लोकांची डोकी फोडली. एवढे होऊनही सोयिस्कर मौन बाळगणारा भाजप महाराष्ट्रात मंत्र्यास खाऊन-पिऊन जामीन देऊन सोडले तरी थयथयाट करीत आहे. जरा त्या खट्टर सरकारच्या सैतानी-राक्षसी हल्ल्यांकडे पहा, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

(हेही वाचा : मंदिरे उघडण्यासाठी भाजपचा राज्यव्यापी शंखनाद)

देशातील शेतकऱ्यांनी उठाव करावा!

रक्ताने ओघळणारी शेतकऱ्यांची डोकी, वेदनेने थरथरणारी शरीरे पहा. ती तुम्हाला का दिसत नाहीत? अमृतसरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच अगदी बाजूला हरयाणामध्ये शेतकऱ्यांचे दुसरे ‘जालियनवाला बाग’ घडत होते, पण ना दिल्लीचे सरकार जागचे हलले ना महाराष्ट्रातील ‘जन आशीर्वाद’ यात्रेला हुंदका फुटला. एक मात्र नक्की, सरकार ज्या निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील शेतकऱ्यांनी उठाव करावा व बळीराजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यावा असे हे प्रकरण आहे. हरयाणातील ‘खट्टर’ सरकारला सत्तेवर राहण्याचा थोडाही अधिकार नाही, पण ‘‘शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाट वाहिले म्हणून खट्टर सरकारला जन आशीर्वादाचा अभिषेक लाभला’’ असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत, असेही शिवसेनेने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.